एक्स्प्लोर

Chandrakant Patil : उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

राज्यात शासकीय स्तरावर 75 हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Chandrakant Patil : राज्यात शासकीय स्तरावर 75 हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले. यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील म्हणाले. पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. 

राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी सहा ठिकाणी अशा स्वरुपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील दोन हजार 33 उमेदवारांना आज नियुक्ती पत्र देण्यात येत आहेत. बेरोजगारी दूर करणे, चांगले, अनुभवी, कुशल मनुष्यबळ प्रशासनात आणणे आणि या माध्यमातून राज्याच्या प्रगतीला गती देणे हा यामागचा उद्देश असल्याचे पाटील म्हणाले. कायद्याची आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाची आहे. नवनियुक्त उमेदवारांनी क्षमतेने काम करीत प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केलं. उमेदवारांना नियुक्ती  देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

पहिल्या टप्प्यात पुणे विभागात 316 पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण

राज्य शासनाने एका वर्षात 75 हजार युवकांना रोजगार देण्याचा 'महासंकल्प' केला  आहे.  त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे विभागामध्ये ऊर्जा, परिवहन आणि ग्रामविकास विभागात एकूण 316 पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. नवनियुक्त उमेदवारांनी आपल्या विभागाला सर्वोच्च स्थान देऊन शासकीय सेवेत समर्पित भावनेने उत्कृष्ट काम करावं. निवड झालेल्या उमेदवारांनी आयुष्यातील हा 'संकल्प दिवस' समजून राज्याच्या प्रगतीला हातभार लावण्याचा संकल्प करावा असेही ते म्हणाले.

 शासकीय सेवेत आल्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत देशसेवा घडते

राज्यातील युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. उमेदवारांना निर्धारित वेळेत नियुक्ती देण्यासाठी महावितरणने मोहीम स्तरावर कागदपत्रांची छाननी केली. व्यक्तीने एखादा व्यवसाय केल्यास त्याची आर्थिक उन्नती होते, मात्र शासकीय सेवेत आल्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत देशसेवा घडत असते. नियुक्ती झालेल्या उमेदवारांवर अंधारलेल्या घरात प्रकाश पोहोचविण्याची जबाबदारी आहे. उद्योग क्षेत्राला तत्परतेने सेवा दिल्यास देशाच्या प्रगतीलाही हातभार लागणार असल्याने सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे मत प्रादेशिक संचालक नाळे यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rojgar Melava 2022 : 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, 2 हजार जणांना नियुक्तीपत्र, पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget