Guillain Barre Syndrome: घरातल्या नळाच्या पाण्याने जीबीएस होतो? पाण्याची गुणवत्ता खरंच पिण्यायोग्य असते का? एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Guillain Barre Syndrome: घरातल्या नळाच्या पाण्याने जीबीएस होतो का, पाण्याची गुणवत्ता खरंच पिण्यायोग्य असते का, एबीपी माझाने थेट जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन वास्तव आणलं समोर, वाचा स्पेशल रिपोर्ट

पुणे: गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा आजार पाण्यामुळं बळावतोय. पुणे-पिंपरी चिंचवडसारख्या शहरात ही अशुद्ध पाणी पिण्यात येत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्यात भर पडत आहे. याचं जीबीएसमुळं काही रुग्ण ही दगावले आहेत. त्यामुळं आता आपल्या घरातील नळाला येणारं पाणी शुद्ध आहे की अशुद्ध? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकाला पडला आहे. याचीचं पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट जलशुद्धीकरण केंद्रात पोहचली. नदीतून उपसा केलेलं अशुद्ध पाणी थेट घरोघरी दिलं जातं का? पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य आहे का? घरोघरी नळाला येणाऱ्या पाण्यानं जीबीएस होऊ शकतो का? प्रत्येकाच्या मनात पाण्याबाबत निर्माण झालेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधली. जे वास्तव आम्हाला दिसलं त्यावर आधारित एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येकाच्या घरात नळाला येणारं पाणी शुद्ध आहे की अशुद्ध? असा प्रश्न गुलेन बॅरि सिंड्रोममुळं निर्माण झाला आहे. हे पडताळण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहचली. इथून शहराला पाणी पुरवठा कसा होतो? शुध्द होतो की अशुद्ध होतो? हेचं आपल्याला पहायचं आहे.
पवना धरणाच्या पाण्यातून शहराची तहान भागली जाते, धरणातून पाण्याचा विसर्ग नदीत होतं अन् तिथून उपसा करून इथं येणारं पाणी अशुद्ध असतं. यापुढं नेमकी काय प्रक्रिया होते. या टप्प्यात ही पाणी अशुद्ध राहतं. तीन वेळा पाण्यावरती प्रक्रिया होते. चौथ्या टप्प्यात पाण्यातले सगळे अशुद्ध कण तळाला जातात, या ठिकाणी पाणी स्वच्छ होतं, मात्र पाण्याचं निर्जंतुकीकरण होत नाही. जीबीएसच्या अनुषंगाने हा पाचवा टप्पा महत्वाचा आहे, इथं क्लोरीनचे लिक्विड टाकलं जातं, यामुळं जीबीएसचा धोका टळतो.
पाण्याचं निर्जंतुकीकरण झालं तरी पाणी पिण्यायोग्य आहे का? याची गुणवत्ता तपासणे गरजेचं असतं. जीबीएसच्या अनुषंगाने सध्या पाण्याचे नमुने घेऊन, पाणी परीक्षण केलं जातं. या प्रयोगशाळेत प्रत्येक दहा मिनिटांनी हे परीक्षण केलं जातं.
पिंपरी चिंचवडमधील घरोघरी येणारं हे तेचं शुद्ध पाणी आहे, ज्याच्यावर जीबीएसच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया या जलशुद्धीकरण केंद्रात राबवली जाते. मात्र यातून तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही हे पाणी उकळून पिऊ शकता. पण प्रश्न उपस्थित होतो, घराबाहेर पडल्यावर कोणतं पाणी प्यायचं? अशावेळी तुम्ही घरातलं पाणी घराबाहेर पडताना सोबत ठेवा. किंवा पाण्याची बाटली विकत घ्या, या अनुषंगाने तुम्ही जीबीएसला स्वतःपासून चार हात लांब ठेवू शकता.
जीबीएस रोग म्हणजे काय?
GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

