एक्स्प्लोर

Sharad Pawar And Ajit Pawar: दोन्ही एकत्र येण्याच्या चर्चा अन् शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; दादांची 'ती' कृती चर्चेत, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar And Ajit Pawar: आज अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी एकाच मंचावर आले, त्याचवेळी त्यांच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं.

पुणे: सध्या महाराष्ट्रात राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागलेत. उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार या चर्चा सुरू असतानाच, दुरावलेले पवार काका-पुतणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी फार सूचक उत्तर दिलं आहे. 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. मात्र त्याआधी आज अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी एकाच मंचावर आले, त्याचवेळी त्यांच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं.

पुन्हा एकमेकांशेजारी बसणं टाळलं

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एआय तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्रमासाठी स्टेजवरील बैठकव्यवस्था अजित पवारांनी पुन्हा बदलली. व्हीएसआयच्या व्यवस्थापनाने स्टेजवर शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांची बैठक व्यवस्था केली होती. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी असलेली त्यांची नेमप्लेट उचलली आणि तिथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची नेमप्लेट सरकवली. त्यामुळे शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांऐवजी बाबासाहेब पाटील बसले आणि अजित पवार त्यांच्या डाव्या बाजुला बसले. दरम्यान या अजित पवारांच्या कृतीची चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या(मंगळवारी,ता 10) वर्धापनदिन आहे. दरम्यान वर्धापानदिनाच्या एक दिवस आधी आज(सोमवारी,ता 9) शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर आले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित आहेत. राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका, साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा वर्धापन दिन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन उद्या (10 जूनला) सकाळी 10.10 वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन, येथे ध्वजारोहण होणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे पक्षाचा मेळावा सकाळी 10.30 ते 1.10 या वेळेत होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 26 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे शहराला वर्धापनदिनाच्या यजमान पदाचा मान मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साजरा होत असलेला हा वर्धापनदिन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा, ताकद देणारा ठरेल हा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन देखील उद्या पुण्यात पार पडणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी

व्हिडीओ

Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
Pune Elections Results 2026: मोठी बातमी : दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
Jalgaon Election Result 2026 Winners: कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Embed widget