एक्स्प्लोर

Dream 11 Pune : ड्रीम 11मुळं कोट्यधीश झालेल्या PSIच्या अडचणीत वाढ, भाजप सरचिटणीसची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

ड्रीम 11 या ऑनलाईन गेममधून त्यांनी दीड कोटी जिंकले आणि त्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले आणि कारवाईच्या कचाट्यातदेखील अडकले. आता भाजपचे सरचिटणीस अमोल थोरातांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली आहे.

पुणे : पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंसाठी करोडपती झाल्याचा आनंद हा क्षणिकच राहिला. ड्रीम 11 या ऑनलाईन गेममधून त्यांनी दीड कोटी जिंकले आणि त्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले आणि कारवाईच्या कचाट्यातदेखील अडकले. आधीच पोलीस उपयुक्तांकडून त्यांची चौकशी सुरू झाली आहे, अशातच भाजपचे सरचिटणीस अमोल थोरातांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पीएसआय झेंडेंची तक्रार केली आहे आणि कडक कारवाईची मागणी केली आहे. 

वर्दीत ते ही ऑन ड्युटी ऑनलाईन गेमिंग मधून पैसे मिळवणं आणि त्याच वर्दीत छाती ठोकपणे माध्यमांपुढं येऊन सांगणं, यातून तरुणांना त्यांनी अशा ऑनलाइन गेम खेळण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप थोरातांनी केला आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांनी खाते निहाय चौकशीचा फास आळवला आहे. वर्दीत ऑनलाईन गेम खेळणं कायद्यात बसतं का? त्यातून रक्कम मिळाल्यावर माध्यमांना वर्दीत उभं राहून मुलाखत देता येते का? या अंतर्गत झेंडेंची पोलीस उपायुक्त चौकशी करत आहेत.

पुढच्या काही तासांमध्ये याचा सविस्तर अहवाल येणं अपेक्षित आहे. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. पण इथं तर स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच या माध्यमातून समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं अनेकांकडून बोललं जातंय. त्यामुळं पोलीस आता त्यांच्याच पीएसआय झेंडेना दोषी ठरवतं की हा केवळ कारवाईचा फार्स ठरतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

प्रकरण काय? 

झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे.  गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात  केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

पिंपरी चिंचवडमधील पीएसआयचे भाग्य उजळलं; ड्रीम इलेव्हनमध्ये जिंकलं तब्बल दीड कोटींचं बक्षीस

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Parvati Case: पुण्यातील पर्वतीमध्ये आजोबांकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, ओठांवर, छातीवर ओरखडे अन् जखमा, पोलिसांची माहिती
पुण्यातील पर्वतीमध्ये आजोबांकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, ओठांवर, छातीवर ओरखडे अन् जखमा, पोलिसांची माहिती
संतापजनक! पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर जीवघेणं दृष्य, क्रेनमध्ये बसून कामगाराने बनवलं रील 
संतापजनक! पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर जीवघेणं दृष्य, क्रेनमध्ये बसून कामगाराने बनवलं रील 
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
संतापजनक! बापानेच स्वत: च्या 9 वर्षीय मुलीला संपवलं, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दिला पेटवून, धक्कादायक घटनेनं दौंड हादरलं
संतापजनक! बापानेच स्वत: च्या 9 वर्षीय मुलीला संपवलं, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दिला पेटवून, धक्कादायक घटनेनं दौंड हादरलं

व्हिडीओ

Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suvendu Adhikari PA Chandranath Rath Murder In Bengal: छातीत गोळ्या घुसल्या अन् सीटवरचा टॉवेल लाल रंगाने माखून गेला, पोलिसांनी 'ती' गोष्ट पाहताच प्रोफेशनल शुटरचं काम ओळखलं
छातीत गोळ्या घुसल्या अन् सीटवरचा टॉवेल लाल रंगाने माखून गेला, पोलिसांनी 'ती' गोष्ट पाहताच प्रोफेशनल शुटरचं काम ओळखलं
Chandranath Rath suvendu Adhikari PA: पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेपूर्वी रक्तरंजित संघर्ष, शुभेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची डोक्यात-छातीत गोळ्या झाडून हत्या, नक्की काय घडलं?
थेट डोक्यात अन् छातीत गोळ्या घातल्या, बंगालमध्ये शुभेंदू अधिकाऱ्यांच्या पीएला कसं संपवलं?
Pune Crime Parvati Case: पुण्यातील पर्वतीमध्ये आजोबांकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, ओठांवर, छातीवर ओरखडे अन् जखमा, पोलिसांची माहिती
पुण्यातील पर्वतीमध्ये आजोबांकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, ओठांवर, छातीवर ओरखडे अन् जखमा, पोलिसांची माहिती
Fish Market BMC: मासळी बाजारात मासे कापण्यावर बंदी; मुंबई महानगरपालिकेच्या अजब निर्णयाविरोधात कोळी बांधवांमध्ये संतापाची लाट, ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारला थेट आव्हान
मासळी बाजारात मासे कापण्यावर बंदी; मुंबई महानगरपालिकेच्या अजब निर्णयाविरोधात कोळी बांधवांमध्ये संतापाची लाट, ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारला थेट आव्हान
Thalapathy Vijay : शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
NCP Rajyasabha Candidate: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार? हे पाच नेते शर्यतीत, रुपाली चाकणकरांच्या पदाबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता
सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार? हे पाच नेते शर्यतीत, रुपाली चाकणकरांच्या पदाबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता
मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
SRH vs PBKS : कूपर कॉनोलीचं शतक वाया, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर   
श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जच्या पराभवाची हॅटट्रिक, गुणतालिकेतील पहिलं स्थान गमावलं, सनरायजर्स हैदराबाद टॉपवर
Embed widget