एक्स्प्लोर

रश्मी शुक्ला यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आयुक्तपदी असताना पुण्यात बिल्डरांकडून खंडणी गोळा करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यात करण्यात आलीय. काँग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांच्यासह निलंबित पोलीस शिपाई दिनेश राठोड यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. शुक्ला या पुणे शहर पोलीस आयुक्त असताना ठाण्याच्या अंजली कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून पोलीस शिपाई दाम्पत्य राठोड यांना निलंबित केलं होतं. एव्हरेस्ट सर केल्याचे प्रमाणपत्र असताना कारवाई झाली होती असा दावा निलंबित पोलीस राठोड यांनी केला आहे. 

राठोड यांना एका दिवसाच्या आत घर खाली करायला लावले होते. त्यावेळी राठोड दाम्पत्यच्या लहान बाळाचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर अनेक आरोप होत असताना त्यांनी अनेक गैरकृत्य केले आहे. रश्मी शुक्ला या दोषी आहेत, खुनी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी खासदार राठोड यांनी केली आहे. शुक्ला यांच्यासह माजी पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांचेवरही कारवाई करावी. धुमाळ हे ATS चा पोलीस होता. त्यावेळी त्याने खंडणी माघीतली होती. तरी त्या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती.

याअगोदरही शुक्ला यांच्यावर आरोप
पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना रश्मी शुक्ला पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत खंडणी गोळा करण्याचे काम करायच्या, असा आरोप काँग्रेस आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे. धुमाळ 2016 मध्ये एटीएसमध्ये कार्यरत असताना त्यांना प्रॉपर्टी सेलमध्ये कार्यरत असल्याचे दाखवत रश्मी शुक्ला यांच्यासाठी खंडणी वसुलीचे काम केल्याचा आरोप राठोडांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असतानाही धुमाळांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचसोबत हे सर्व प्रकरण त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित होते. त्यांनीच हे सर्व प्रकरण रफा-दफा केल्याचा आरोप राठोडांनी केला.

धनंजय धुमाळांवर कोणतीही कारवाई नाही
राठोड म्हणाले, पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांना निलंबित केल्याचं मीडियासमोर सांगितलं होतं. मात्र, माहितीच्या अधिकारात धनंजय धुमाळांवर कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नसल्याचं उजेडात आलं आहे. धुमाळ निवृत्त होण्यापूर्वीच त्यांना स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी धुमाळ यांचे निलंबन केल्याचं म्हंटलं होतं. त्याचसोबत सदर फुटेजची सीडी फॉरेन्सिक लॅबला पाठवत त्यासंबंधी शहानिशा करु असं देखील म्हंटलं होतं. मात्र, यातील एकही गोष्ट शुक्ला यांनी केली नाही.

काय आहे प्रकरण?
2016 साली पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी, जाधव यांनी व्हीडिओ क्लिप काढत धुमाळ यांची तक्रार केली होती. मात्र, याप्रकरणी तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कारवाई केली नव्हती. ही व्हीडिओ क्लिप माध्यमात आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget