Dehu News : वारकरी संप्रदायाकडून देहू बंदची हाक तर दोन दिवसांनी महाराष्ट्रही बंद करणार; काय आहे नेमकं कारण?
उद्या देवस्थान आणि ग्रामस्थांनी देहू बंदची हाक दिली आहे. परवा देहूतील मार्ग चहुबाजूंनी बंद केली जाणार आहेत त्यानंतर ही सरकार जागं झालं नाही तर वारकरी सांप्रदाय महाराष्ट्र बंद ठेवण्याच्या तयारीत आहे.
![Dehu News : वारकरी संप्रदायाकडून देहू बंदची हाक तर दोन दिवसांनी महाराष्ट्रही बंद करणार; काय आहे नेमकं कारण? dehu news dehu bandha calls from warkari community know details Dehu News : वारकरी संप्रदायाकडून देहू बंदची हाक तर दोन दिवसांनी महाराष्ट्रही बंद करणार; काय आहे नेमकं कारण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/3d7ab7298550b4831d0411e135977d651701434505966442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
देहू, पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थानचे (Dehu) विश्वस्त ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला बसलेत. चौथा दिवस उजाडला तरी सरकारने या उपोषणाकडे डोकावून ही पाहिलं नाही. म्हणूनच देहूकर आता आक्रमक झालेले आहेत. उद्या देवस्थान आणि ग्रामस्थांनी देहू बंदची हाक दिली आहे. परवा देहूतील मार्ग चहुबाजूंनी बंद केली जाणार आहेत. त्यानंतर ही सरकार जागं झालं नाही तर वारकरी सांप्रदाय महाराष्ट्र बंद ठेवण्याच्या तयारीत आहे.
सरकार देहूतील 50 एकर गायरान जागा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देण्याचा घाट घातला आहे. ही जागा वारकरी सांप्रदायासाठी आणि गावच्या विकासासाठी द्यावी. अशी मागणी मान्य होत नसल्यानं देहूतील मंदिरासमोर आमरण उपोषण सुरु आहे. तरी ही सरकारला कीव येईना म्हणूनच उद्या देहू बंदची तर पुढे महाराष्ट्र बंद करण्याची तयारी वारकरी सांप्रदयाने केलेली आहे.
वारकऱ्यांचं काय म्हणणं आहे?
या बंद नंतरही जर सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही राज्यातलं प्रत्येक गाव बंद करु असा इशारा वारकऱ्यांकडून देण्यात आला आहे. राज्यभरातून आम्ही पाठिंबा मागणार आहोत. आयुक्तालयाता दिलेली जागा देहूत आलेल्या वारकऱ्यांसाठी, किर्तनासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. या जागेत विठुनामाचा गजर होईल, मात्र सरकारने या जागेवर आयुक्तालयाला देण्याचा घाट घातला आहे.त्याला विरोध करण्यासाठी 4 दिवसांपासून उपोषण करत आहोत. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं नाहीतर महाराष्ट्र बंदची हाक देऊ, असा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे.
सरकारलं दुर्लक्ष केलं म्हणून पुन्हा वारकरी आक्रमक...
काही दिवसांपूर्वी श्री क्षेत्र देहूची गायरान जमीन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयास देण्यास आज श्री संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त आणि देहूतील नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला होता. ग्रामस्थांनीही सहभाग घेतला होता. ‘देहू बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. गायरान हे नगरपंचायत इमारत आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने रुग्णालय व निवास व्यवस्था यासाठी लागणार आहे.देहूत वर्षभरात तुकाराम बीज, संत तुकाराम पालखी सोहळा व अन्य सोहळ्याच्या निमित्ताने दहा ते पंधरा लाख भाविक येतात. त्यांच्यासाठी ही जागा हवी आहे, असं म्हणत नगरसेवक रस्त्यावर उतरले होते. मात्र त्यावेळी या आंदोलनाला सरकारनं गांभीर्यानं घेतलं नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट देहू बंदची हाक दिली आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)