एक्स्प्लोर

Ajit Pawar : कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा; चुकलात तर गाठ माझ्याशी; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

कार्यकर्त्यांनो कुणा एकाचं कुंकु लावा आणि  मी ज्या  कार्यकर्त्यांना पद दिली मानसन्मान दिला आणि जर तो कार्यकर्ता चुकला तर अजित पवार यांच्याशी गाठ आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांना सज्जड दमदेखील दिला. 

शिर्सुफळ, बारामती :  राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून काही कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी आपले पवार कोणते याची निवड केली नाही. हेच कार्यकर्ते कधी अजित पवारांच्या सभेत दिसतात तर कधी शरद पवारांना पाठिंबा देताना दिसतात. याच दोन्ही दगडावर पाय ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलीच तंबी दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, काही कार्यकर्ते माझ्या देखील सभेमध्ये येतात मला दिसतात आणि दुसरे सभेला आले की त्यांच्याकडेही जातात. कार्यकर्त्यांनो कुणा एकाचं कुंकु लावा आणि  मी ज्या  कार्यकर्त्यांना पद दिली मानसन्मान दिला आणि जर तो कार्यकर्ता चुकला तर अजित पवार यांच्याशी गाठ आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांना सज्जड दमदेखील दिला. 

आता सुनेला मतदार करा!

शिर्सुफळमध्ये बोलताना अजित पवारांनी अनेक विषयावर भाष्य केलं. मात्र चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सुनेला मतदान करायचं का  मुलीला मतदान करायचं हे तुम्ही ठरवा, असं म्हणत सुनेत्रा पवारांना मतदान करण्यात आवाहन केलं. चार दिवस सासुचे ही म्हण ऐकी आहे मात्र आता चार दिवस सुनेचे येऊ द्या. एक काळ झाला की सासूदेखील सुनेच्या हातात घराचा कारभार देते. सून चुकल्यास तिला बोलते मात्र कारभार देण्याचं काम तरी करते. तसंत आता सुनेला मतदान करण्याची गरज आहे. बारामती लोकसभेचा विकास करायचा असेल. तर सुनेत्रा पवारांना मत देणं त्यांना निवडून देणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले. 

मागील खासदाराने काय केलं

मागील खासदाराने काय केलं हे आपल्याला माहिती आहे. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील लोक आपल्या चांगल्या संपर्कातले आहेत. ते शब्द खाली पडू देणार नाही आणि विकास केला तर निधीदेखील देतील, असंही अजित पवार म्हणाले.  राज्याचा निधी आपल्याला कमी पडतो म्हणून केंद्राचा निधी आणणे गरजेचे आहे. कृष्णा नीरा भीमा नदी जोड काम सुरू आहे  कृष्णा खोऱ्याचे पाणी निरा नदीत आणले आहे.आणि मीरा नदीतून ते भीमा नदीत उजनी धरणात सोडले जाणार आहे, या पाण्याचा फायदा मराठवाड्याला होणार आहे. त्यामुळे कोणाला मत द्यायचं हे ठरवण्याचं काम तुमचं आहे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित केलं. 

एकेकाही मीदेखील मोदींवर टीका करायचो. मात्र खरा विकास मोदींनी केला आहे.देशात 71 हजार कोटीची कर्जमाफी झाली.असे विरोधक सांगतात मात्र राज्याची किती झाली? याचा आकडा एकदा जाऊन बघा. सगळेच कामं मी करतो, असा दावा मी करत नाही मात्र काही वैयक्तिक कामं मी केली आहेत. ती मलाही माहिती आबेत, असंही ते म्हणाले. 

या निवडणुकीत अनेकांना भावनिक आवाहन केलं जाईल. मात्र भावनिक आवाहनाचा बळी पडू नका. जिथे विकास दिसेल तिथेच मत द्या. विकासकाम करताना मी टोलवा टोलवीचे उत्तरं देणार नाही. उद्या या, परवा या, अशी उत्तरं देणार नाही आणि मुंबईवरुन आल्यावर भेट, अशी उत्तरं तर अजिबात देणार नाही म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Amol Kolhe Vs Adhalrao Patil : शिरुरमध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंमध्ये तू तू मै मै सुरुच!

Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Airport Shut Rain : मुंबईला तुफान पावसानं झोडपलं,  विमानतळाचे सगळे रनवे बंदMumbai Wadala Rain Accident : मुंबईत पावसाचा हाहाकार! वडाळ्यात कोसळला टॉवर ABP MajhaMumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Embed widget