एक्स्प्लोर

Pune News : पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दौंड कोर्टाचा दणका; उपविभागीय पोलीस अधिकारी, पीआय, पीएसआयवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

Pune News : पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक,  पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर दौंड न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यात कसूर करुन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Pune crime News :  कर्तव्यात कसूर करुन आऱोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दणका दिला आहे. पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर दौंड न्यायालयाने गुन्हा दाखल (pune crime) करण्याचे आदेश दिले आहेत. मोरगाव इथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातील जमीन खरेदी विक्री प्रकरणात पोपट तावरे यांनी फसवणूक केल्याची तक्रार किरण भोसले आणि आरती लव्हटे यांनी केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणात पोपट तावरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, यवत पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी. आर गंपले यांच्यासह पोपट उर्फ कैलास तावरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. किरण भोसले आणि आरती लव्हटे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जमीन खरेदी-विक्रीच्या फसवणुकीवरुन तावरे यांच्यासह केरबा लव्हटे, रामदास लव्हटे, लक्ष्मण लव्हटे आणि जनाबाई लव्हटे यांच्याविरोधात आरती लव्हटे आणि किरण भोसले यांनी यवत पोलिसांकडे फिर्यादी दिल्या होत्या. कारण बारामती तालुक्यातील क्षेत्र असले तरी त्याची खरेदी मात्र दौंड तालुक्यातीलच दुय्यम निबंधक कार्यालयात होते. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

इतरांवर कारवाई करताना मात्र या गुन्ह्यात पोपट तावरे यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, अशी तक्रारदारांची तक्रार होती. दुसरीकडे तक्रारदाराचे साक्षीदार न घेता आरोपीलाच वाचवण्याचा प्रयत्न करत त्याला अनुकूल साक्षीदारांचे जबाब घेऊन खोटी फिर्याद असल्याचे पोलिसांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीने तोपर्यंत अटकपूर्व जामीन घेतला. त्यामध्ये पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली असा आरोप करत त्यामुळे आरती लव्हटे आणि किरण भोसले यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला.

तसेच सुरुवातीला या पोलीस अधिकाऱ्यांसमोर आरोपीविरोधात पुरावा असताना देखील आरोपी पोपट उर्फ कैलास तावरे यांच्याशी संगणमत करुन त्याला मदत करण्याच्या हेतूने जाणून-बुजून खोटा अहवाल पाठवणे तसंच फिर्यादी याची फसवणूक करणे आणि पोलीस अधिकारी यांचे कायदेशीर कर्तव्यामध्ये कसूर करणे या आणि अशा कारणास्तव तक्रारदार यांनी ॲड.राजेश कातोरे आणि ॲड.अमित काटे यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. यावर आता कोर्टाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याआधीसुद्धा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं कोर्टाने सांगितले आहे. 420, 464, 120ब, 192,196 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Embed widget