ससून रुग्णालयाच्या विरोधात काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप
ससून रुग्णलयात कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान हलगर्जीपणा करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या 'डीन'वर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करा, अशी तक्रार काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर योग्यरित्या उपचार केले जात नाही. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नातेवाईकांना क्वॉरंटाईन केले जात नाही. कमी-जास्त झाले तर रुग्णाला इतर रुग्णालयात जाण्यास सांगतात, अशा अनेक तक्रारी या पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत. पुण्यात सर्वाधिक मृत्यू हे ससून रुग्णालयातच झाले आहेत.
लॉकडाऊन होऊन 19 दिवस झाले तरी ससून प्रशासनाला 11 मजली इमारत तयार असताना आयसोलेशन कक्ष तयार करता आला नाही. आपली जबाबदारी दुसऱ्या रुग्णालयावर टाकण्याचे काम हे रुग्णालय करत आहे, असा आरोप पुणे महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केलाय. कोरोनाबाधित रुग्णांकडे ससून रुग्णालयाचे डिन व्यवस्थित लक्ष देत नाहीत. ससून रुग्णालय प्रशासन पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहे. ससून रुग्णालयाच्या डिन अजय चंदनवाले यांना समज देऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई तरी करण्यात यावी, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली. सुरुवातीपासूनच ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची योग्य ती काळजी घेत नसल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यात आतापर्यंत 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यात सर्वाधिक 23 ससून रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झालाय.राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ
राज्यात कोरोनाचा आकडा वाढला 1981 राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता दोन हजारच्या जवळ गेला आहे. आज मुंबईतील धारावी, मालेगाव आणि नागपुरात नव्याने कोरोना रुग्ण आढळले. आताच्या घडीला राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1982 झाली आहे. आज मुंबईत तब्बल 22 जणांचा बळी गेला. आतापर्यंत राज्यात सर्वात जास्त 92 मृत्यू मुंबईत झाले आहे. तर, राज्यात 149 जणांचा कोरोनामुळे जीव गेलाय. आज पुण्यात आज दोन बळी गेलेत. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक नर्सला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या संपर्कातील 25 नर्सेसला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्येच 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आलीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.
SSC Exam Cancelled | दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही