एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात हृदय रुग्णालयात वेळेत पोहचवण्यासाठी थांबवला मुख्यमंत्र्यांचा ताफा
सोलापुरातील यशोधरा रुग्णालयात 19 वर्षीय मुलाला ब्रेन हॅमरेजमुळे ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. त्याचं हृदय पुण्यात आणण्यात आलं होतं. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.
पुणे : मुख्यमंत्र्यांच्या किंवा एखाद्या मंत्र्यांचा ताफा जात असल्याने अनेकदा रस्ते रिकामे केले जातात. रस्त्यावरील इतर गाड्या थांबवल्या जातात. तुम्हालाही कधीतरी यामुळे ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागलं असेल. मात्र पुण्यात याउलट घडलं आहे. हृदय घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सला रस्ता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफ्यालाच काही वेळ थांबावं लागलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी अवयवदान झालेलं एक हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेले जात होते. त्याच मार्गावर मुख्यमंत्र्यांचा ताफाही जात होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांमुळे अॅम्ब्युलन्सचा वेग मंदावला होता. कमीत कमी वेळेत अॅम्ब्युलन्स रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचणे आवश्यक होते.
त्यामुळे पुणे पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याऐवजी अॅम्ब्युलन्सला पुढे जाण्यास प्राधान्य दिले. पुणे पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून कौतुक केलं आहे.
सोलापुरातील यशोधरा रुग्णालयात 19 वर्षीय मुलाला ब्रेन हॅमरेजमुळे ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. त्याचं हृदय पुण्यात आणण्यात आलं होतं. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. 2015 पासूनचं पुण्यातील गे 100 वं ग्रीन कॉरिडॉर होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement