एक्स्प्लोर

आधी पत्नी, मग भाऊ, आता 17 वर्षाचा सोबती म्हणतो, लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी मीच, शत्रुघ्न काटे बंडाच्या तयारीत!

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटेंनी (Shatrughna Kate ) निवडणूक लढवण्याची इच्छा  व्यक्त केली आहे. तसेच लक्ष्मण भाऊ असते तर त्यांनी मलाच त्यांचं राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं, असा दावा ही काटेंनी केला आहे. 

पिंपरी चिंचवड चिंचवड विधानसभेची (Chinchwad Vidhan Sabha Election)  उमेदवारीवरून विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) या दीर-भावजयांमध्ये लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरून वादविवाद सुरू असताना यामध्ये आणखी एका नावाची पडली आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटेंनी (Shatrughna Kate ) निवडणूक लढवण्याची इच्छा  व्यक्त केली आहे. एवढच नव्हे कर शत्रुघ्न काटे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे देखील  बोलून दाखवलं आहे. 
  
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap)  यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांच्या मतदारसंघावर दीर  पिंपरी- चिंचवड (Pimpri- Chinchwad)   भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap)  यांनी दावा ठोकलाय.  मीच खरा उत्तराधिकारी म्हणत  शत्रुघ्न काटेंनी या वादात उडी घेतली आहे. भाजप परिवारवाद टाळेल आणि मला उमेदवारी देईल. मात्र असं घडलं नाही तरी माझं निवडणूक लढायचं ठरलं आहे. अशावेळी अश्विनी जगताप की शंकर जगतापांविरोधात लढायला आवडेल, ते पक्ष ठरवेल. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे,  असं म्हणत शत्रुघ्न काटेंनी बंडखोरीच्या तयारीत असल्याचं बोलून दाखवलं.

शत्रुघ्न काटे निवडणूक लढवण्यावर ठाम 

चिंचवड विधानसभेत आमदार अश्विनी जगताप की शहराध्यक्ष शंकर जगतापांविरोधात लढायला आवडेल का?  मी विधानसभा लढण्यावर ठाम आहे, असे म्हणत  शत्रुघ्न काटे यांनी चिंचवडमध्ये बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली आहे. काटेंनी समर्थकांसोबत बैठक घेऊन, याची घोषणा केली. आज लक्ष्मण भाऊ असते तर त्यांनी मलाच त्यांचं राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं, असा दावा ही काटेंनी केला आहे. 

यावेळी मला पक्ष डावलणार नाही : शत्रुघ्न काटे 

 शत्रुघ्न काटे म्हणाले, आमच्या प्रभागाची मिटींग झाली त्या मिटींगमध्ये ठरले आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे. गेली 12 वर्षे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. दोन टर्म मी नगरसेवक राहिलो आहे. मी भाजपचे तिकिट मागत आहे आणि  त्याच तिकिटावर  मी लढवणार आहे.  चिंचवड  मतदारसंघात 2009  सालापासून लक्ष्मण जगतापांसोबत मी प्रचार प्रमुख,निवडणूक प्रमुख म्हणून काम केले आहे. मला या संपूर्ण मतदारसंघाची व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे मला असे वाटते की, आतापर्यंत मला दोनदा पक्षाने डावलले आहे पण आता मला डावलेल असे मला वाटत नाही.  

लक्ष्मण भाऊ असते तर मलाच राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं : शत्रुघ्न काटे

आज लक्ष्मण भाऊ असते तर त्यांनी मलाच त्यांचं राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं. कारण गेली 17  वर्षे  मी त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत होतो. जर आज लक्ष्मण जगताप असते तर 100 टक्के त्यांनी मला संधी दिली असती याची मला खात्री आहे, असे शत्रुघ्न काटे म्हणाले. तसेच मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. जर विद्यमान आमदार आश्विनी जगतापांविरोधात लढण्याची वेळ आली तर मी माझ्या कार्यकर्त्यांनी बोलवून त्यांचा निर्णय घेईल, असे शत्रुघ्न काटे म्हणाले. 

हे ही वाचा :

"दिवंगत लक्ष्मण जगतापांची उत्तराधिकारी मीच", दीरानंतर वहिनी विधानसभा लढण्यावर ठाम, पुन्हा गृहकलह होणार?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmi Shukla Transfer | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची बदली
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची बदली
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ माघार घेणार का? छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी, शिवसेनेच्या नॉट रिचेबल उमेदवारांबाबतही महत्त्वाचं भाष्य
समीर भुजबळ माघार घेणार का? छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी, शिवसेनेच्या नॉट रिचेबल उमेदवारांबाबतही महत्त्वाचं भाष्य
Supriya Sule on Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Transfer | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची बदलीLaxman Hahe PC | मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदChhagan Bhujabal On Manoj Jarange : देर आए दुरुस्त आए, जरांगेंच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 04 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmi Shukla Transfer | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची बदली
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची बदली
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ माघार घेणार का? छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी, शिवसेनेच्या नॉट रिचेबल उमेदवारांबाबतही महत्त्वाचं भाष्य
समीर भुजबळ माघार घेणार का? छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी, शिवसेनेच्या नॉट रिचेबल उमेदवारांबाबतही महत्त्वाचं भाष्य
Supriya Sule on Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Supriya Sule on Devendra Fadnavis : 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
Bhum Paranda: मोठी बातमी : ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की रणजीत पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की रणजीत पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
Nashik Central Assembly Constituency : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
Manoj Jarange Not Contest Elections: गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम
गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम
Embed widget