Pune By poll : राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी सुरू, उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक
Chinchwad By Election : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड विधासभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
![Pune By poll : राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी सुरू, उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक chinchwad by election preparations for chinchwad by election have started from ncp Pune By poll : राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी सुरू, उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/29/b9be2365bcadaf8fef0d4292f9da218c1675015082832328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP ) चिंचवड पोटनिवडणुकीची ( Chinchwad By Election ) तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर उद्या चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आलीय. चिंचवड पोटनिवडणूक लढणार असल्याचं राष्ट्रवादीकडून आधीच जाहीर करण्यात आलय. त्यामुळे राष्ट्रवादीने आता निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड विधासभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबात चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची उद्या संध्याकाळी साडेचार वाजता बैठक होणार आहे.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह भाजपने आवाहन केले आहे. परंतु या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर उत्तर आणि पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची उदाहरणे देत पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या समन्वयावर देखील भाष्य केले आहे. "आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत. आमच्यामध्ये समन्वय असून काळजी करण्याचे काही कारण नाही. लोकप्रतिनिधी फोडण्याची पावले शिंदे गटाकडून जास्त दिसत आहेत, पण असं घडत असतं. त्याची जास्त काळजी करण्याची गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता. एकंदरीत राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने तयारी देखील सुरू केली आहे.
दरम्यान, भाजपकडून अद्याप उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. भाजपकडून जवळपास दहा नावे केंद्रीय निवडणूक समितीला देण्यात आली आहेत. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल कलाटे देखील या पोटनिवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु, याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणाचेच नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar on Pune By-election : आताच कसं सुचलं? काही कळत नाही; शरद पवारांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवरून दिले स्पष्ट संकेत!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)