एक्स्प्लोर

Ajit Pawar: दादांनी सरड्यांचे डायनोसर केले..., साथ सोडताचं भोईरांचा घणाघात, चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला खिंडार

Ajit Pawar: चिंचवडची जागा भाजपला सुटत असल्याने भाऊसाहेब भोईरांचा पक्षाला रामराम ठोकला आहे. तीस वर्षे सातत्यानं माझ्यावर अन्याय झाला, असंही भाऊसाहेब भोईर यांनी म्हटलं आहे.

पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या नेत्यांनी आपापले निर्णय घेत पक्षातंराची भूमिका स्पष्ट केली आहे, भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का बसला आहे. भाऊसाहेब भोईरांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला रामराम ठोकला आहे. चिंचवडची जागा भाजपला सुटत असल्याने भाऊसाहेब भोईरांचा पक्षाला रामराम ठोकला आहे. तीस वर्षे सातत्यानं माझ्यावर अन्याय झाला, असंही भाऊसाहेब भोईर यांनी म्हटलं आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) सरड्यांचे डायनोसर तयार केले. भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीची एक पिढी ही तयार केली. अजित पवारांची साथ सोडताना असा घणाघात ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांनी केला आहे. यानिमित्ताने भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेत ही अजित पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. चिंचवडची विधानसभा लढण्यास तीव्र इच्छुक असलेल्या भाऊसाहेब भोईरांनी अखेर घड्याळाचे काटे फिरवलेत. 2009 साली माझा कार्यक्रम करण्यासाठी, दिवंगत लक्ष्मण जगताप हे अपक्षचं आमदार झाले. मग आता या सर्वांचा आपण ही तसाच कार्यक्रम करू शकतो. असं म्हणत भोईरांनी बंडखोर करणार असल्याचं समर्थकांसमोर जाहीर केलं.

चिंचवडची जागा भाजपला सुटणार असल्यानं भोईरांनी हा नवा डाव खेळला आहे. यावेळी अजित पवारांनी शहरात सरड्यांचे डायनोसर तयार केले. त्यांनी भ्रष्टाचाराची एक पिढी तयार केली, असा घणाघात ही भोईरांनी केला. मुळात त्यांना हे समजलंच नाही की हे खरंच लायक आहेत का? अजितदादा विकासाच्या दृष्टीने पाहत होते, मात्र इथं शहराची पुरती वाट लागली. साथ सोडताच अशी जहरी टीका भोईरांनी केली आहे. 

चिंचवड विधानसभेत अजित पवारांना मोठा धक्का

चिंचवडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले नाना काटे यंदा भाजपसोबत दोन हात करण्यास सज्ज आहेत, यासाठी शरद पवारांच्या पक्षात त्यांनी स्वतंत्रपणे फिल्डिंग लावलेली आहे. दुसरीकडे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नढे या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची उघडपणे भेट घेतली. त्याचबरोबर आम्ही एकूण पंधरा माजी नगरसेवक तुतारी फुंकण्यासाठी श्वास रोखून उभे आहोत, असा दावा केला.

तिसरीकडे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर अजित दादांना (Ajit Pawar) एकामागोमाग एक बसणारे हे धक्के पाहता, त्यांचा बालेकिल्लाचं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आता या डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार कोणता मार्ग शोधणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget