एक्स्प्लोर
कोंबडी पळाली, 'चार तंगड्यां'वर नाचायला लागली
निगडीतल्या एका चिकन शॉपमध्ये चक्क चार पायांची कोंबडी सापडली आहे.
पिंपरी : एक कोंबडी विकत घेतलीत, तर किती 'लेग पीस' मिळतात? हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. मात्र पिंपरी-चिंचवडकर सध्या या प्रश्नाचं 'चार' असं उत्तर देत आहेत. कारण निगडीतल्या एका चिकन शॉपमध्ये चक्क चार पायांची कोंबडी सापडली आहे.
निगडीतील तन्वीर चिकन शॉप मध्ये नेहमीप्रमाणे शंभर-सव्वाशे कोंबड्या आल्या. दुकान मालक कुदबुद्दीन होबळे हे हॉटेलला चिकनचा पुरवठा करत असल्यामुळे सकाळीच कोंबड्या हलाल करणं सुरु झालं. तितक्यात एका कसायाने कुदबुद्दीन यांना कोंबडीला चार पाय असल्याचं सांगितलं.
कुदबुद्दीन यांनी कसायाला दोन शब्द सुनावले आणि चेष्टा सोडून कामाकडे लक्ष द्यायला सांगितलं. शेवटी कसायाने ती कोंबडी बाहेर आणून कुदबुद्दीन यांना दाखवली, मग काय मालकसुद्धा अचंबित झाले.
तीस वर्षांच्या व्यवसायात पहिल्यांदाच चार पायाची कोंबडी पाहिल्याने, त्यांना ही यावर विश्वासच बसेना. बघता-बघता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आणि आबालवृद्धांनी ही कोंबडी पाहण्यासाठी गर्दी केली.
कसायाला चार पाय दिसले आणि या कोंबडीचं नशीबच फळफळलं. मालक कुदबुद्दीन यांच्याकडून आता या कोंबडीला विशेष सेवा मिळत आहे.सकाळी पिंजऱ्यात ठेवलेल्या सर्व कोंबड्या हलाल झाल्या पण 'ती' ला मात्र मालकाने जपून ठेवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement