एक्स्प्लोर

शाईफेक प्रकरणात ताब्यात घेतलेल्या पत्रकाराला सोडलं, पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर निर्णय

Chandrakant Patil News: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाई फेक प्रकरणात एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला ताब्यात घेतलं होतं, त्याला सोडण्यात आलं आहे.

Chandrakant Patil News: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाई फेक प्रकरणात एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आलं होतं. पत्रकार गोविंद वाकडे यांना या प्रकरणात ताब्यात घेतलं होतं. रात्री उशीरा त्यांना सोडण्यात आलं आहे.  चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. गोविंद वाकडे आणि आरोपींमधील फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅट देखील पोलीसांना सापडलं होतं, अशी माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर गोविंद वाकडेंवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या अटकेची बातमी समजताच राज्यभरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या होत्या.

दरम्यान आता पत्रकार गोविंद वाकडे यांना पिंपरी पोलिसांकडून सोडण्यात आले आहे. पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर पोलिसांनी गोविंद वाकडे यांना सोडून दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात गोविंद वाकडे हे शाई फेक करणाऱ्या आरोपींच्या आधीपासून संपर्कात होते असा त्यांच्यावर आरोप झाल्याने काल रात्रीपासून गोविंद वाकडेंना पोलिसांकडून पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले होते. गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले आहे. गुन्हे मागे घेतले आहेत. वाकडे यांची सुटका झाल्याने उद्याचे निषेध एसएमएस आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी सांगितलं आहे.

तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, गोविंद वाकडे यांना अटक झालेली नाही. पोलिस या विषयात त्यांची काही भूमिका आहे का याबाबत तपास करत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की पोलिसांना त्यांचं काम करु द्या. पुराव्यांच्या आधारेच पोलिस काम करतात. गोविंद वाकडेंना अटक झालेली नाही.   

शाईफेक प्रकरणात तिघांना अटक

काल चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करून राजकीय द्वेशातून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केलाय.  माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे. पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानी सारखे वागू लागले आहे असे वाटते. 307 म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न आणि 353 म्हणजे  सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का?  मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने 700 हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांच्यावर 302 सह  ही कलमे का लावण्यात आले नाहीत, असं शेट्टींनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊतChhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget