Pune Sinhagad Road: सिंहगड रोडच्या पुलाच्या कामाला गती द्या; चंद्रकांत पाटलांचं आयुक्तांना पत्र
कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानच्या राजाराम पूलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार आहे.
Pune Sinhagad Road: पुण्यात अति प्रमाणात पाऊस झाल्याने खड्डे, रस्ते आणि वातुक कोंंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात सर्वपक्षांकडून भाजपला दोषी ठरवण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नांवर लक्ष घातलं आहे.
कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानच्या राजाराम पूलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या या कामाला गती द्या, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉ विक्रम कुमार यांना दिल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या प्रस्तावित कर्वेनगर ते सनसिटी पूल या प्रकल्पाची भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकातदादा पाटील यांनी कर्वेनगर स्मशानभूमी येथे पाहाणी केली. सगळ्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाज पत्रकातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकातदादा पाटील यांनी सदर प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहाणी केली. त्याचा आढावा घेतला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित पुलामुळे सिंहगड रोड आणि कोथरूड आणि कर्वेनगर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने, प्रस्तावित पुलाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून सदर प्रकल्पास गती देण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली आहे.
1 किलोमीटर प्रवासासाठी 1 तास
सिंहगड रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होते. 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 1 तास लागतो, अशी तक्रार नागरीकांनी केली होती. त्यामुळे या रस्त्यांची वाहतूक नीट सुरळीत करण्यासाठी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी चंंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.