एक्स्प्लोर

दीपक मानकरांवर अटकेची टांगती तलवार, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे.

मुंबई: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. मानकरांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुसाईडनोटमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे मानकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आता दीपक मानकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील विविध खंडपीठांनी नकार दिला होता. जितेंद्र जगताप हे अनेक वर्ष दीपक मानकर यांच्याकडे काम करत होते. त्यांनी 2 जून रोजी आत्महत्या केली होती. जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दीपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. या पाच जणांत दीपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. कर्मचाऱ्याची आत्महत्यासुसाईड नोटमध्ये मानकरचं नाव मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दीपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते. दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचं म्हटलं आहे. दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं. संबंधित बातम्या :  दीपक मानकरांना हायकोर्टाचा पुन्हा झटका  दीपक मानकरांच्या याचिकेवर सुनावणीस दुसऱ्या खंडपीठाचाही नकार  दीपक मानकर 'आऊट ऑफ कव्हरेज'!  पुण्यातील नगरसेवक दिपक मानकर अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जितेंद्र जगतापच्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकरांचं नाव पुणे : जितेंद्र जगताप यांचा लहान भाऊ आणि मुलासोबत बातचीत 

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget