एक्स्प्लोर
कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कल्याणमधील युवकाला हायकोर्टाचा दिलासा
भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध करत आंदोलनात सहभागी होऊन घोषणा देत भगवा ध्वज फडकवल्याप्रकरणी काहीजणांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचे मुंबई उच्च न्यायालयानं चांगलेच कान टोचले आहेत.
मुंबई : भगवा ध्वज फडकवला आणि घोषणा दिल्या म्हणून एखाद्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं स्पष्ट करत हायकोर्टाने पोलिसांना समज देत याप्रकरणी याचिकाकर्त्याला दिलासा देत त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध करत आंदोलनात सहभागी होऊन जय भवानी, जय शिवराय आणि हर हर महादेव अशा घोषणा देत भगवा ध्वज फडकवल्याप्रकरणी काहीजणांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचे मुंबई उच्च न्यायालयानं चांगलेच कान टोचले आहेत.
पुण्यात झालेल्या कोरेगाव-भीमा हिंसाचाराचे तीव्र पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. कल्याणमध्येही या घटनेचे पडसाद उमटले होते. कल्याणमधील राहुल शशिकांत महाजन यांनी या आंदोलनात सहभागी होत भगवा झेंडा फडकवत जय भवानी, जय शिवराय आणि हर हर महादेव अशा घोषणाही दिल्या. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी महाजन तसेच इतर काही जणांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते त्यामुळे महाजन यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. परंतु सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर महाजन यांनी हायकोर्टात धाव घेत अपील दाखल केलं होतं. न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement