पावसाळी अधिवेशनापूर्वी भरत गोगावलेंची मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. या विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा नंबर जवळजवळ निश्चित असल्याची चर्चा आहे.

रायगड : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाल्यानंतर आता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार आहे. येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी माहिती आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. या विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा नंबर जवळजवळ निश्चित असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील संधी हातची घालवल्यानंतर त्यांच्यावर पस्तावण्याची वेळ आली होती. ती "घडी” अखेर जवळ आली आहे. 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पाडण्यात येणार असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने तिन्ही पक्षातील काही आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. तसेच नवीन चेहर्यांना संधी दिली जाणार असून यात रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले यांची देखील वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
भरत गोगावले यांना दोन वर्षापासून मंत्रिपदाची हुलकावणी सुरूच
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ज्या ज्या वेळी चर्चा होते त्या त्या वेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपद आणि रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार हे फिक्स असताना ऐनवेळी त्यांना थांबण्यास सांगितलं. तेव्हापासून भरत गोगावले यांना मंत्रिपदाची हुलकावणी सुरूच आहे. शिंदे गटानंतर सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदं देण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडलं. त्यामध्ये वाद असलेल्या रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीला मंत्री बनवलं. त्यामुळे तटकरे हे कानामागून आले आणि तिखट झाले अशी काहीशी अवस्था गोगावलेंची झाली होती.
हे ही वाचा :
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार? खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांना डच्चू, भाजप तरुण चेहऱ्यांना संधी देणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
