एक्स्प्लोर

Baramari News : शेख कुटुंबाकडून गेल्या आठ वर्षांपासून बाप्पाची पूजा; यंदा ज्येष्ठा गौरींची सुद्धा स्थापना करत दिला ऐक्याचा संदेश

Baramari News : बारामतील शेख कुटुबियांकडे आठ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात होता. मात्र यंदा त्यांच्या घरात त्यांनी ज्येष्ठा गौरींची स्थापना केली आहे.

बारामती : जात, धर्म यांच्या चौकटी मोडत पुणे (Pune ganeshotsav 2023) जिल्ह्यातील बारामतीमधील एका मुस्लिम कुटुंबियांने त्यांच्या घरात गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. बारामतील शेख कुटुबियांकडे आठ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात होता. मात्र, यंदा त्यांच्या घरात त्यांनी ज्येष्ठा गौरींची स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांचं बारामती तालुक्यात चांगलंच कौतुक होताना दिसत आहे. 

देशात, राज्यात आणि महत्वाचं म्हणजे लहान मोठ्या गावांमध्ये जातीय तेढ वाढत असताना त्यांनी राखलेला हा सामाजिक सलोखा वाखणण्याजोगा आहे. कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावं असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. गेल्या आठ वर्षापासून शेख कुटुंब गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून मोठ्या श्रद्धेने गणपतीची आराधना करत आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या जोडीला गौराई आणली आहे. यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच गौराई बसवल्या आहेत. शेख कुटुंबात सहा जण राहतात. सहाही जणांनी मनोभावे गौरी गणपतीची पुजा केली. जाती-धर्माच्या भिंती ओलाडून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेख कुटुंब हे सहा जणांच असून शिकंदर शहाबुद्दीन शेख, आलिमा सिकंदर शेख, कईम सिकंदर शेख आणि मोहम्मद सिकंदर शेख गुण्या गोविंदाने राहतात. 

या गौरीदेखील खास आहे. 25 वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्टी या गावात काम करत असताना त्यांच्या वडिलांना गौराईचे मुखवटे सापडले होते. त्यानंतर त्यांनी ते जपून ठेवले होते. मुस्लिम समाजात गौराई बसवल्या जात नाहीत. मात्र सगळ्यांचे देव सारखेच असतात आणि गणपती सगळ्यांचा देव आहे. रक्षण करणारा आहे. त्यामुळे गौरी गणपतीवरील निस्वार्थ श्रद्धा असल्याने यावर्षी पहिल्यांदाच शेख कुटुंबाने गौराई बसवल्या आहेत. 

शेख कुटुंबियांकडे माहेरवाशिण आल्या गौरी... 

खरंतर सध्या सगळीकडे जातीवरुन राजकारण होताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ यांच्यातून वादावादी वाढताना दिसत आहे. त्यातच शेख कुटुंबियांनी गणपती आणि गौरींची स्थापना करुन सामाजिक सलोख्याचा आणि ऐक्याचा संदेश दिला आहे. आपण सर्व एक आहोत कुठलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केल आहे. एकमेकांवर श्रद्धा ठेवा, माणसं म्हणून वागा माझी बाप्पावर श्रद्धा आहे मात्र यावर्षी आम्ही गौंरीचीदेखील पुजा करण्याचं ठरवलं असल्याचं शेख कुटुंबीय सांगतात.

इतर महत्वाची बातमी-

Pune News : सोनपावलांनी गौरी आल्या! बसलेल्या गौरी अन् जागरण गोंधळ देखाव्याची पुण्यात चर्चा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
Pune Crime News: ती कामावरून घरी परतली नाही; शोधाशोध अन्....; पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, वकिलाच्या पत्नीनं विवाहितेला हाल-हाल करुन संपवलं, गोणीत भरून ठेवलं, पुण्यातील घटना
ती कामावरून घरी परतली नाही; शोधाशोध अन्....; पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, वकिलाच्या पत्नीनं विवाहितेला हाल-हाल करुन संपवलं, गोणीत भरून ठेवलं, पुण्यातील घटना
Sheetal Tejwani Pune Land Scam : मुंढवा जमीन घोटाळ्यातील 'मास्टरमाईंड' शीतल तेजवानीला जामीन, बावधन पोलिसांचा 'या' चुकांमुळे तुरुंगातून सुटली, हलगर्जीपणा नडला
मुंढवा जमीन घोटाळ्यातील 'मास्टरमाईंड' शीतल तेजवानीला जामीन, बावधन पोलिसांचा 'या' चुकांमुळे तुरुंगातून सुटली, हलगर्जीपणा नडला

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Rohit Pawar and PM Modi: पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
Embed widget