एक्स्प्लोर
दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचं अथर्वशीर्ष पठण
पुणे : गणेशेत्सवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज अथर्वशीर्षाचं पठण करण्यात आलं. गेल्या 29 वर्षांपासून दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केल्या जाणाऱ्या या सामूहिक अथर्वशीर्षाच्या पठणात जवळपास 21 हजार महिलांनी सहभाग घेतला.
ऋषीपंचमीदिवशी दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं. या पठणासाठी शिवसेनेच्या नेत्या आमदार निलम गोऱ्हेही उपस्थित होत्या. तसंच पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनीही या पठणावेळी हजेरी लावली.
नाशिकमध्येही महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष
दरम्यान पुण्याप्रमाणेच नाशिकच्या राजीवनगरमध्येही महिलांनी सामूहिक अथर्वशीर्षाचं पठण केलं. यूनिक ग्रुप मंडळाकडून अथर्वशीर्ष आणि गणेश स्तोत्र पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 6 ते 7 या वेळेत झालेल्या या पठणात परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement