Asim Sarode : राहुल नार्वेकरांची बदनामी झाली असेल, राज्यपालांचा अपमान झाला असेल तर त्यांनी माझ्यावर केस करावी : असीम सरोदे
Asim Sarode : बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात सरोदे दाद मागणार आहेत.

पुणे : बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल असीम सरोदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. गेल्या 25 वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत करतो, लोकांसाठी मी विविध विषयात काम केलं आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केलं आहे, असं सरोदे म्हणाले. राज्यपाल यांना मी फालतू म्हणालो म्हणून मी मिसकंडक्ट केलं असं म्हटलं आहे. जर मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची मी माफी मागेल, असं असीम सरोदे म्हणाले.
Asim Saode : असा निर्णय होईल, अशी अपेक्षा नव्हती : असीम सरोदे
माझ्यावर बालंट लावलं आहे, ज्यांचे आपल्यावर प्रेम आहे ते कुठं चुकलंय ते सांगतात. न्यायव्यवस्थेवर प्रेम असेल, संविधानावर प्रेम असेल. न्यायव्यवस्थेत काही चुका आणि उणिवा असतील तर त्या सांगितल्या तर त्यात चूक काय आहे? कुठली नवी व्याख्या तयार होतेय, असा सवाल असीम सरोदे यांनी केला.
असीम सरोदे पुढं म्हणाले की, मला असा निर्णय होईल असं कधीच अपेक्षा नव्हती. या निर्णयामुळं मला प्रचंड वाईट वाटलं. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून हा निर्णय देण्यात आला. माझ्या विरोधात न वकिली करणाऱ्या राजेश दाभोलकरने तक्रार केली आहे. राजेश सुरेश दाभोलकर भाजपचा कार्यकर्ता आहे. राजेश दाभोलकर यांचे सर्व फोटो भाजप नेत्यांसोबत आहेत. मोदी, आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत.
मी गैरवर्तणूक केली आहे असा शब्द वापरला आहे, असा शब्द वापरला आहे. राजेश दाभोलकर यानं सर्वांना 38 मिनिटांच्या भाषणाचा पेन ड्राईव्ह दिला होता. उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय हा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा आमदार अपात्र या विषयावर बोललो होतो. तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंह कोश्यारी हे फालतू माणूस आहेत पण महत्त्वाच्या पदावर बसलेला असल्यानं आपल्याला तसं बोलता येत नाही, असं म्हटल्याचं मान्य करतो, असं असीम सरोदे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयानं 10 व्या शेड्युलनुसार कोण पात्र, कोण अपात्र याबाबतचा निर्णय घ्या असं राहुल नार्वेकर यांना सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात राहुल नार्वेकर यांनी केला हे सुद्धा मी म्हणालो. न्याय व्यवस्थेत न्यायाधीश भ्रष्टाचारी आहेत, असं मी म्हणालो हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे कोणीही दाखवून द्यावं, असं आव्हान असीम सरोदे यांनी केलं.
मी म्हटलं ते मला मान्य आहे, तुम्ही जो चुकीचा अर्थ काढला तो मान्य नाही असं म्हटलो हे जजमेंटमध्ये आहे, असं असीम सरोदे म्हणाले. फालतू जेव्हा मी बोललो तेव्हा भगतसिंह कोश्यारी राज्यपाल नव्हते. माझी सगळी 4 वाक्य मी म्हणालो आणि हे वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणणार कारण हे वास्तव आहे. फालतू हा शब्द असंसदीय शब्द आहे का? शिवी आहे का?, राहुल नार्वेकरांची बदनामी केली असेल तर त्यांनी माझ्यावर केस करावी, असं असीम सरोदे म्हणाले. राज्यपाल यांचा अपमान झाला तर त्यांनी माझ्यावर केस करावी, असंही त्यांनी म्हटलं.
बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागणार: ॲड. असीम सरोदे
मी काळा कोट घालून मुलाखती देऊ शकतो. ॲड. असीम सरोदे म्हणून मी तुमच्याशी बोलू शकतो. फक्त बॅण्ड लावून मी युक्तिवाद करू शकत नाही, असं असीम सरोदे म्हणाले.
12 ऑगस्ट 2025 रोजी ऑर्डर काढली. ऑर्डर मला आज मिळाली तेव्हा निर्णय झाला तर मग आज का दिली? या निर्णयाच्या विरोधात मी बार कौन्सिल इंडियामध्ये अपील करणार आहे. या निर्णयावर स्टे मागणार आहे. 12 ऑगस्ट नंतर मी सातत्यानं बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या कार्यालयात निर्णयाबाबत विचारलं होतं तेव्हा सांगण्यात आलं नाही. विचारलं तर तेव्हा मला का नाही सांगितलं? मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केस लढवतो आहे, सुप्रीम कोर्टात 12 तारखेला केस आहे मग मुद्दाम केलं का असा सवाल सरोदे यांनी केला.
दरम्यान, बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून असीम सरोदे यांची सनद रद्द होताच उद्धव ठाकरे, अनिल परब, राजू शेट्टी यांनी फोनवरुन संपर्क साधला.
























