एक्स्प्लोर

Pune Anushka Parekh Record: जिंकलंस पोरी! पुण्याची अनुष्का पारेख बनली कमी वेळात वजनदार डेडलिफ्ट उचलणारी भारतातील सर्वात 'तरुण' मुलगी

19 वर्षीय अनुष्का वैभव पारीख हिने  5 सेकंदात 100 किलो वजनाची डेडलिफ्ट यशस्वीरीत्या पार करून विश्वविक्रम रचला आहे.

Pune Anushka Parekh Record: 'हौसले बुलंद हो तो मंजीले दूर नही होती", हे वाक्य जगणारी आणि जगवणारी पुण्यातील 19 वर्षीय अनुष्का वैभव पारिख हिने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 19 वर्षीय अनुष्का वैभव पारीख हिने  5 सेकंदात 100 किलो वजनाची डेडलिफ्ट यशस्वीरीत्या पार करून विश्वविक्रम रचला आहे.

2018 मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचे नाव लौकिक मिळवणारी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू अनुष्काने पुन्हा एकदा तिची जिद्द दाखवून दिली आहे आणि 5 सेकंदात 100 किलो वजनाची डेडलिफ्ट यशस्वीरीत्या पार करून कमीत कमी वेळेत सर्वात वजनदार डेडलिफ्ट करणारी भारतातील सर्वात तरुण मुलगी बनली आहे. तिचे नाव इंटरनॅशनल बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. अनुष्का, MIT-WPU मधील TY BA लिबरल आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. 

अनुष्काने वर्ल्ड बुक्सच्या ऑनलाइन जागतिक स्पर्धेत भाग घेतला ज्यामध्ये सहभागी वजन उचलण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अर्ज करु शकतात. सहभागींना एक फॉर्म भरावा लागतो आणि रेकॉर्डसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. एकदा नोंदणी केल्यानंतर सहभागींनी पूर्व-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी किमान सेकंदात उचललेल्या वजनाची महिती द्यावी लागते. ज्याचे आंतरराष्ट्रीय ज्यूरीद्वारे परिक्षण केलं जातं. याच स्पर्धेत 55-60 किलो वजनी गटात सहभागी होत अनुष्काने अवघ्या 5 सेकंदात 100 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले.

गेल्या दीड वर्षापासून मी वजन उचलत आहे. माझ्याकडे डेडलिफ्टमध्ये 90 किलोचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे, जो 2021 मध्ये इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये वैशिष्ट्यीकृत झाला आहे. हा पराक्रम 9.25 सेकंदात झाला होता. तिने जिल्हा, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला असला आणि विविध प्रकारांतर्गत सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले असले तरी तिने आता 110 किलो डेडलिफ्ट करण्याचा निर्धार केला आहे जे तिला 5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत करायचा आहे, असं ती सांगते. माझ्या जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्रम केलेल्या खेळाडूंसोबत मी गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धेची तयारी करत होतो. स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आम्ही फेडरेशनद्वारे अर्ज करण्यास सुरुवात केली होती, असंही ती आत्मविश्वासाने सांगते.

 माझी आईच मला सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. मी माझी आई शिल्पा पारीख यांच्याकडून प्रेरित आहे जी स्वतः पॉवर-लिफ्टर आणि फिटनेस उत्साही आहेत. त्यासोबतच कुटुंबीयांच्या आणि मित्रमंडळींच्या पाठिंब्यामुळेच मी हे करु शकले. याचं सर्व श्रेय त्यांना जातं असं तिने सांगितलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar NCP Minister List : दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar NCP Minister List : दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
छातीत कळ आल्याची तक्रार, न्यायालयीन कोठडीतून नेले रुग्णालयात, परभणी कोठडीत मृत्यू प्रकरणात IG शहाजी उमाप म्हणाले..
छातीत कळ आल्याची तक्रार, न्यायालयीन कोठडीतून नेले रुग्णालयात, परभणी कोठडीत मृत्यू प्रकरणात IG शहाजी उमाप म्हणाले..
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Embed widget