एक्स्प्लोर

छातीत कळ आल्याची तक्रार, न्यायालयीन कोठडीतून नेले रुग्णालयात, परभणी कोठडीत मृत्यू प्रकरणात IG शहाजी उमाप म्हणाले..

parbhani : घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. त्यांनी परभणीकरांना शांततेचं आवाहन केलं असून या प्रकरणात प्रशासनाची मदत करण्यासही सांगितलंय,

Parbhani: परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी (३५) असे असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. तरुणाचा मृत्यू छातीत कळ आल्याने झालाअसून शवविच्छेदनानंतर कारण अधिकृत होईल.

ते म्हणाले,'अकरा तारखेला घडलेल्या प्रकारात आरोपी म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेला  सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीतच मृत्यू झाला, आज सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार त्याने जेल ऑथॉरिटीकळे केली होती. त्या आधारावर जेल ऑथॉरिटीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती केले. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ हा वडार समाजाचा असून पुणे येथे राहणारा आहे. तो दगडफेकी प्रकरणातील आरोपी होता. परभणीकरांनी शांतता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे सगळी टेक्निकल फॉर्मलिटी पूर्ण करण्यात येणार आहे. 'असे आयजी शहाजी उमाप म्हणाले.

परभणीकरांना शांततेचं आवाहन

परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सोमनाथ सुर्यवंशी असे 35 वर्षीय मृत तरुणचे नाव आहे.कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा अस्वस्थता आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर आयजी शहाजी उमाप यांनी परभणीकरांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.

नक्की झाले काय?

परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली. या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या ५० लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा कारागहातच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमनाथ सुर्यवंशी असे ३५ वर्षीय मयत तरुणचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणास मृत घोषित केले.या घटनेने परभणीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी हा परभणी मधील विधी महाविद्यालयामध्ये विधीचा स्टुडन्ट होता त्या ठिकाणी चे शिक्षण सुरू होतं आणि तो पुणे येथून  दोन दिवसांपूर्वी परीक्षेसाठी पुण्यावरून तो परभणीत आला होता आणि या दरम्यान ही घटना घडली पोलिसांनी त्याच्यावर एफ आय आर दाखल करत त्याला ताब्यात घेतले होते आणि यानंतर त्याचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत झाला त्यामुळे या मृत्यूची सखोल चौकशी वरिष्ठ यंत्रणामार्फत करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी नेत्यांनी केली आहे.

हेही वाचा:

मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता

महत्त्वाच्या बातम्या

Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget