(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirur Lok Sabha : मी अजित पवारांसोबत जातोय या चर्चांना अजून वेळ, आढळरावांच्या विधानाने शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक
Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार असं एकदाही बोललो नाही असं वक्तव्य शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी केलं आहे. आढळराव हे सध्या शिंदे गटात आहेत.
पुणे : शिरुर मतदारसंघातील (Shirur Lok Sabha) शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मी अजित पवारांसोबत जातोय या चर्चांना अजून वेळ आहे, जागावाटप झाल्यावर ठरवू असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले. त्यामुळे जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली तर आढळराव अजित दादांसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाची मात्र धाकधूक चांगलीच वाढल्याची चर्चा आहे.
अजित पवारांच्या ताज्या वक्तव्यावरून पुण्यातील शिरूर लोसकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार गटामध्ये असल्याने त्यांचा पराभव करणार म्हणजे करणार असं आव्हान अजित पवारांनी केलं आहे. या ठिकाणचा खासदार आपण निवडून आणणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आढळराव पाटील काय करणार याची चर्चा सुरू झाली होती.
अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्ष मिळून शिरूर लोकसभेचा उमेदवार कोण हे ठरवतील. मात्र मी अजून एकदा ही बोललो नाही की मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जातोय. जागांचं वाटप झाल्यावर ठरवू.
अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच
राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे असल्याचं दिसून येतंय. अमोल कोल्हेंना या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असा निश्चय अजित पवारांनी केला. अजित पवार म्हणाले की, "एका खासदाराने आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं. आता त्यांचं चाललंय सगळं. पण मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशा गोष्टी त्यांनी येऊन सांगितल्या."
ही बातमी वाचा:
VIDEO : Shivajirao Adhalrao Patil : दादांच्या राष्ट्रवादीतून आढळराव रिंगणात?आढळराव म्हणतात....