Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...
अजित पवार दगडूशेठ गणपती दर्शनाला गेल्याने रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं (Dagadusheth temple)दर्शन घेऊन आरती करुन सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोघेही दगडूशेठ चरणी लिन झाले आणि विजयासाठी साकडं घातलं. अजित पवार दगडूशेठ गणपती दर्शनाला गेल्याने रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे. रोहित पवारांनी (Rohit Pawat) सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय़?
रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, 'अजितदादा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्राकाकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता. पण कदाचित नव्या संगतीच्या परिणामाने आपण तिकडं दुर्लक्ष केलं की महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका कथित गुरुजींशी आपली चर्चा झाल्याने त्यांनी भिडे वाड्याला नमस्कार न करण्याचा कानमंत्र आपल्याला दिला, हे माहीत नाही. पण बाकी काही असो, आपला 'मोदी टू द्रौपदी' प्रवास मात्र एक्स्प्रेस झाला!
काका पुतण्यात पुन्हा सोशल वॉर
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यांचे सोशल वॉर आणि टीका टिपण्णी करताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यापासून पवारांच्या दोन्ही काका पुतण्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं बघायला मिळालं. शरद पवारांनी घरातले पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केल्याने सुनेत्रआ पवार आणि अजित पवारांच्या मनाला लागलं. त्यानंतर सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या. यालाच उत्तर देताना शरद पवारांनी वाक्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं. त्यासोबतच रोहित पवारांनीदेखील अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे. कधी राजकारणावरुन , कधी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवरुन तर कधी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन रोहित पवार अजित पवारांवर टीका करताना दिसत आहेत.
मा. अजितदादा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्राकाकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात… pic.twitter.com/ewPGkymnO2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 19, 2024
इतर महत्वाची बातमी-