एक्स्प्लोर

Chandani Chawk Flyover : चांदणी चौकातील नव्या पुलाच्या कामाची पोलखोल; काहीच महिन्यात पुलावर खड्डे; NHAI चा मात्र भलताच दावा

कोट्यावधी रुपये खर्चून चांदणी चौकात बांधण्यात आलेल्या पुलावर अवघ्या काहीच दिवसांत खड्डे पडाय़ला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचं दिसून येत आहे.

पुणे : कोट्यवधी रुपये खर्चून चांदणी चौकात बांधण्यात आलेल्या पुलावर (Chandani Chawk Flyover) अवघ्या काहीच दिवसांत खड्डे पडाय़ला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचं दिसून येत आहे. बॉम्बचे मोठे ब्लास्ट करुन चांदणी चौकातील जुना पूल पडला नव्हता. मात्र, नव्या पुलावर वाहतूक सुरु होऊन काहीच महिने झाले आहेत आणि खड्डे पडायला सुरुवात झाल्यानं या पुलाच्या कामाचं पितळ उघडं पडलं आहे. 

खासदार सुप्रिया सुळेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे आणि त्यांनी अशा मोठ्या प्रकल्पाच्या रस्त्यावर काही महिन्यातच खड्डा पडणं अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे, असं त्यांनी म्हटलंय. 'चांदनी चौकातून एनडीएपासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. 'एनएचएआय'ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही तोवर हि स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

NHAI चं काय म्हणणं आहे?

पुलाचे दोन भाग एकमेकांना जोडण्यासाठी वेळ लागतो. हे भाग नीट जोडले गेले नाहीत त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, असं NHAI कडून सांगण्यात आलं आहे आणि रस्त्यावर खड्डे पडणं म्हणजे फार गंभीर नाही, असा दावादेखील NHAI कडून केला जात आहे. लवकरच या खड्ड्यावर काम करुन लोखंडी सळई टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

खड्डे थेट डांबराने बुजवले... 

 चांदणी चौकातील पुलावर पहिल्या दिवसापासून टीका होत आहे. भुलभुलैया रस्त्या झाला आहे आणि शिवाय काम पूर्ण व्हायच्या आधीच याचं उद्घाटन करण्याची घाई केली असंही बोललं गेलं आहे. मात्र आता या पुलावर खड्डे पडल्याचं दिसत आहे. NHAI कडून सारवासारव केली जात आहे. मात्र खड्डे दिसताच NHAI ने साधं डांबर टाकून बुजवले आहेत. 

 वाहतूक कोंडी जैसे थे...

चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी सुटणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्यापही चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटली नसल्याचे चित्र आहे आणि आता निकृष्ठ दर्जाचं काम असल्याचंही समोर आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Yuva Sangharsha Yatra Rohit Pawar : गावात पुढाऱ्यांना 'नो एट्री'; मराठा समाजाने रोहित पवारांची यात्रा तळेगाव ढमढेरेमध्ये थांबू दिली नाही, मात्र...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Embed widget