News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

सोलापूरच्या उपमहापौरांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिले; पोलिसांची भूमिका संशयास्पद

सोलापूरचा उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असताना ताप आणि शिंका येऊ लागल्याने पोलिसांना काळे यांना सोडून दिले आहे.

FOLLOW US: 
Share:
पिंपरी चिंचवड : सोलापूरचा उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळे यांना ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळे यांना  कोरोनाची लक्षणं येत असल्याचं पोलिसांना सांगितले, मग काय पोलीस चक्रावले आणि काळेला नोटीस देऊन सोडण्यात आले. पण खरंच काळे यांना ताप आणि शिंका आल्या होत्या का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. काळेंना शुक्रवारी सोलापूर येथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काळे यांनी पिंपरी चिंचवडमधील त्याचा एक फ्लॅट 7 ते 8 जणांना विक्री केलेला आहे. याच प्रकरणाची चौकशी सुरू असताना काळे यांनी हा बहाणा केल्याचं बोललं जातंय. सोलापूर येथून ताब्यात घेतलेल्या काळे यांना काल रात्री पिंपरी चिंचवडमध्ये आणताच, त्याचं मेडिकल चेकअप झालं. तेव्हा काळेंना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मग आज सकाळपासून दाखल गुन्ह्यात काळेंची चौकशी सुरू झाली. तेव्हा मात्र काळे यांनी ताप चढला, शिंका आणि खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणं आहेत, असं कारण पुढं करत काळे यांना शनिवारी पाच वाजता नोटीस बजावून सोडण्यात आले. पण काही तासांपूर्वी केलेल्या मेडिकल चेकअपमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटू लागली. वरिष्ठांच्या कानावर ही बाब पडताच. याप्रकरणाची तपासणी करणारे पोलीस उपनिरीक्षक आर एस पन्हाळेंची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. केरळच्या 'छत्री पॅटर्न'चं पुण्याच्या मंचरमध्ये अनुकरण ठरलं फायदेशीर! पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह सोलापूर येथून ताब्यात घेतलेल्या काळे यांना काल रात्री पिंपरी चिंचवडमध्ये आणताच, त्यांचं मेडिकल चेकअप झालं. तेव्हा काळें यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मग दाखल गुन्ह्यात काळेंची चौकशी सुरू झाली. तेव्हा मात्र काळेंना ताप चढला, शिंका आणि खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणं आहेत, असं कारण पुढं करत काळे यांना शनिवारी पाच वाजता नोटीस बजावून सोडण्यात आले. पण काही तासांपूर्वी केलेल्या मेडिकल चेकअपमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटू लागली. वरिष्ठांच्या कानावर ही बाब पडताच. याप्रकरणाची तपासणी करणारे पोलीस उपनिरीक्षक आर एस पन्हाळे यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Published at : 30 May 2020 10:45 PM (IST) Tags: Pimpri Chinchwad police Rajesh Kale Solapur Deputy Mayor corona symptoms

आणखी महत्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

Pune News : सावकारी पाश, 10 वर्षीय मुलाला गळाला दाबून संपवलं अन् नवरा -बायकोने गळ्याला दोर लावला; पुण्यात काळजाचं पाणी करणारी घटना

Pune News : सावकारी पाश, 10 वर्षीय मुलाला गळाला दाबून संपवलं अन् नवरा -बायकोने गळ्याला दोर लावला; पुण्यात काळजाचं पाणी करणारी घटना

Coldplay Concert : कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे मुंबई-पुणे हायवे अनेक तासांपासून जाम, रुग्णवाहिकांसह मंत्र्याची गाडीही अडकली

Coldplay Concert : कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे मुंबई-पुणे हायवे अनेक तासांपासून जाम, रुग्णवाहिकांसह मंत्र्याची गाडीही अडकली

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा, पत्नी जयश्री पाटलांच्या खात्यावर 43 लाख जमा; एसटी कामगार संघटनेचे खळबळजनक आरोप

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा, पत्नी जयश्री पाटलांच्या खात्यावर 43 लाख जमा; एसटी कामगार संघटनेचे खळबळजनक आरोप

टॉप न्यूज़

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा

Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत

Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत