Pimpri Chinchwad Accident : पिंपरी चिंचवडचे पोलिस झोपलेत का? हलगर्जीपणा सुरूच; भरधाव कारची महिलेला धडक, 24 तासांनंतरही गुन्हा नाही
Pimpari Hit And Run Case : भरधाव वेगाने आलेल्या कारने महिलेला धडक दिली आणि कारचालक कारसह पसार झाला. त्यानंतर अद्याप गुन्हा नोंदवण्यात आला नाही.
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार वाढत असताना पोलिस मात्र झोपी गेलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतरही त्यावर वेळीच कारवाई केली जात नाही. भोसरी परिसरात असेच हिट अँड रनचा प्रकार (Pimpari Hit And Run Case) घडला असताना त्याला 24 तास उलटून गेले तरीही त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
भरधाव कारची महिलेला धडक (Pimpri Chinchwad Accident CCTV Video)
भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटी समोर एका भरधाव कारने महिलेला उडवल्याची घटना घडली. त्यानंरत ती कार न थांबता गेली. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ती कार एवढ्या भरधाव होी की ती महिला हवेत उडाली.
या अपघाताची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद झाली आहे. अपघातात त्या महिलेला जखमी करून संबंधित कारचालक कारसह पसार झाला आहे. आता पोलिसांना या कार चालकाला ताब्यात घेण्याचं मोठं आव्हान समोर असणार आहे.
या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. दोन दिवसांपूर्वी हिंजवडी भागात देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. माध्यमांत बातमी आल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिंपरीतील अपघाताप्रकरणी तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल
पिंपरीत एका भरधाव वेगाने आलेल्या कारने एका मुलीला उडवलं होतं. मात्र इतका भीषण अपघात होऊन ही पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नव्हता. अखेर या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला अन एबीपी माझाने हा प्रकार समोर आणला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांना जाग आली असून बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
या अपघातात जखमी आकांक्षा परदेशी या तरुणीला केवळ मुका मार लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र पहिल्या दिवशी म्हणजे, 23 मे ला गुन्हा दाखल का केला नाही? तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करायची तसदी का घेतली? उपस्थित झालेल्या या प्रश्नांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आता पिंपरी चिंचवड पोलीस करत असल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा: