एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोठी बातमी : मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर पुण्यात झळकले, निकालापूर्वीच सेलिब्रेशन सुरु

Lok Sabha Election : काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर जल्लोषही सुरू केल्याचं दिसतंय. 

पुणे : निवडणुकीचा प्रचार सुरु असताना विजयाचा दावा सर्वच उमेदवार करत असतात. पण मतदान संपल्यावर हे उमेदवार काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असतं. पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेगकर यांनी आपण पन्नास हजारांच्या आसपासच्या मताधिक्यानी निवडून येईन असा दावा केला आहे. त्याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरुडमधून आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा केलाय. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील मुरलीधर मोहळांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आलेत. 

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडलं असून 4 जून रोजी त्याचा निकाल लागेल. पण त्या आधीच काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. आता या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्या पुढेही जात थेट आपल्या नेत्यांचे भावी खासदार असं होर्डिंग लावल्याचं दिसतंय. 

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचे भावी खासदार या आशयाचे बॅनर्स पुण्यात झळकताना दिसत आहेत. त्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू केल्याचं दिसतंय. 

पुणे लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत असून वसंत मोरे हे वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पण मुख्य लढत ही काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्येच असल्याचं सांगितलं जातंय. 

दरम्यान, पुण्यामध्ये भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकरांनी रविवारी पोलीस ठाण्यातच आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी करत त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याचं दिसून आलं. तर धंगेकरांच्या आंदोलनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनीही ठिय्या आंदोलन करत उत्तर दिलं. पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत. 

काँग्रेसने अनधिकृत बॅनर लावल्याचा आरोप

फडके हौद चौकात कॉंग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर अनधिकृत असून पोलीस त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे आणि हे बॅनर काँग्रेसकडून लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मतदान केंद्राच्या परिसरात अशा प्रकारचं बॅनर लावून मतदारांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. 

11 मेला प्रचार संपला त्यानंतर कोणत्याही पद्धतीचा प्रचार करता येत नाही. मात्र मतदानाच्या दिवशी शंभर मीटर दूरपर्यंत साधारण काहीही लावता येत नाही. मात्र कॉंग्रेसने त्यांच्या उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह असलेलं बॅनर बुथवर लावलं आहे. अशा प्रकारचं बॅनर लावायला बंदी आहे. हे आचारसंहितेंचं उल्लंघन आहे. सगळ्या गोष्टी बेकायदेशीर करण्याची धंगेकरांची परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते हेमंत रासने यांनी केली आहे. त्यासोबतच रासनेंची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
Embed widget