Exclusive ... तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना फुटली नसती, अमित शाह यांची सडेतोड मुलाखत
Amit Shah Exclusive Interview : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली.
मुंबई: शरद पवारांना (Sharad Pawar) त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे, जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते असा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला. 'एबीपी माझा'ला अमित शाह यांनी Exclusive मुलाखत दिली असून त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. आज रात्री 7.56 मिनिटांनी ही मुलाखत एबीपी माझावर पाहता येईल.
काय म्हणाले अमित शाह?
शरद पवार जर त्यांच्या मुलीच्या जागी अजित पवारांनी संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर त्यांचा पक्ष कधीच फुटला नसता. पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपवर लावला जातोय असा थेट आरोप अमित शाह यांनी केला.
#ZeroHour पाहा केंद्रीय मंत्री अमित शाह EXCLUSIVE आज रात्री 7.56 वाजता एबीपी माझावर.. #AbpMajha #AmitShahOnABP @AmitShah @1SaritaKaushik pic.twitter.com/ztb2E8ITao
— ABP माझा (@abpmajhatv) May 13, 2024
राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं असून 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य हे मतदानपेटीत बंद झालं आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाण्यासह नाशिक, धुळ्यामध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी अमित शाह हे धुळ्यात प्रचारासाठी आले होते.
याआधीही पवार-ठाकरेंवर जोरदार हल्ला
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या आधीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या आधीच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोलताना अमित शाह म्हणाले होते की, शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यामध्ये क्षमता असूनदेखील त्यांच्यावर अन्याय केला. त्याचवेळी उद्धव ठाकरे हेदेखील त्यांच्या पुत्रप्रेमामुळे आंधळे झाले असून त्यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्याचमुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांना डावललं.
उद्धव ठाकरे शरद पवारांना शरण जातील
या आधी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि राहुल गांधी यांना शरण जातील असंही अमित शाह म्हणाले होते.
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख केला आहे.
ही बातमी वाचा: