Manoj Jarange Patil Pune : "कोणाच्या बालेकिल्ल्यात नाही तर जिथं मराठे, तिथं आम्ही"; शिवनेरी गडावर अनवाणी पायाने पोहचले जरांगे पाटील
पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या जुन्नरच्या शिवनेरी गडावर मनोज जरांगे पाटील अनावाणी पायाने पोहचले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटमची आठवण करुन दिली.
पुणे : मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन मोठा लढा उभा (Maratha Reservation) करणारे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतर आज थेट पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या जुन्नरच्या शिवनेरी गडावर अनावाणी पायाने पोहचले. शिवाजी महाराजांना अभिवादन करुन ते पुणे जिल्ह्यातील मॅराथॉन सभेला सुरुवात करणार आहे. शिवनेरीची माती कपाळाला लावून अन्याया विरोधात लढण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहे, असं ते म्हणाले आहे. त्यासोबतच आम्ही कोणाच्या बालेकिल्ल्यात नाही तर मराठे जिथं असेल तिथं सभा घेतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जरांगे पाटलांनी 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यासाठी चार दिवस शिल्लक आहे. मात्र मागील 10 दिवस सरकारकडून कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी फोन आलेला नसल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर 24 ऑक्टोबरपर्यंत आम्ही शांत राहणार आहोत. मात्र त्यानंतर सरकारला आमचा आवाज पेलवणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला दिला आहे.
महाराष्ट्रातल्या गोरगरिब लेकरांना आरक्षण मिळू दे. या सगळ्या लेकरांना लढण्यासाठी बळ द्या. त्यांच्या पाठिवर शाबासकी आणि आशीर्वादाची थाप द्या. मराठ्याचा कोणाताही मुलगा नोकरी किंवा शिक्षणावाचून अडून राहू नये, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे आणि आत्महत्येचं पाऊल उचलू नका, असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केलं आहे.
शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. हा आरोप जरांगे पाटलांनी खोडून काढला आहे. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचा पाठिंबा आहे. जिथं मराठे तिथं आम्ही, असं म्हणत त्यांनी हा आरोप खोडून काढला आहे. आज बारामतीत ही सभा होणार आहे. मात्र मी कोणाच्या बालेकिल्ल्यात सभा घेत नाही तर मराठ्यांच्या न्यायासाठी मराठे जिथे असेल तिथे सभा घेतो. आम्ही शेतातली आणि मातीतली माणसं आहोत अशीच कोणाच्या हातील लागणार नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
जगातलं सर्वात मोठं आमचं श्रद्धास्थान म्हणजे शिवराया आहे आणि मी संस्कृती मानणारा माणूस आहे. त्यात शिवाजी महाराजांचं स्थान सर्वोच्च आहे. त्यामुळे मी अनवाणी पायाने त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
आज जरांगे पाटलांचा दौरा कसा असेल?
-सकाळी सात वाजता जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांंच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे.
-त्यानंतर ते 10 वाजता जुन्नरला येणार आहे. तिथे त्यांचं जय्यत स्वागत करण्यात येणार आहे.
- सकाळी 11 वाजता त्यांनी खेड राजगुरुनगरमध्ये सभा होणार आहे.
-खेडची सभा झाल्यानंतर 3 वाजता त्यांची बारामतीत सभा होणार आहे. बारामतीत तीन हत्ती चौकात ही सभा होणार आहे.
- 5 वाजता फलटण आणि त्यानंतर रात्री 8 वाजता दहिवडीत भेट देणार आहेत.
इतर महत्वाची बातमी-