TET Exam Scam: अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा
TET Examination Scam : शिक्षक भरती पात्रता परीक्षेत गैरमार्गाने उत्तीर्ण झालेल्या अपात्र शिक्षकांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

TET Examination Scam : राज्यात शिक्षक भरती घोटाळा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 900 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं होतं. आता, या अपात्र आणि गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 7 हजार 900 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. आता लवकरच या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
अपात्र उमेदवार पात्र झालेल्या उमेदवारांची पत्यासह यादी तयार करण्यात आली. पोलिसांकडून ही यादी शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे. आता यादीतील नावांची खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेदवारांविरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रशासनाकडून त्यामुळे आता त्या अपात्र उमेदवारांचे ही धाबे दणाणले आहेत.
जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा सीईओ गणेशन पुणे पोलिसांपुढे हजर
जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन मंगळवारी पुणे पोलिसांपुढे हजर झाला. बंगळुरू येथील न्यायालयाकडून गणेशन याने अटकेपासून २५ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण मिळवले आहे. पुणे पोलिसांपुढे हजर होत त्याने तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले. टीईटी प्रकरणात यापूर्वी डॉ. प्रीतीश देशमुख आणि अश्विनकुमार याला बंगळुरूहून अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत गणेशन याचे नाव आले होते समोर आले होते. त्यानंतर गुन्ह्यात तपास कामी हजर राहण्यासाठी ई मेलवर गणेशन याला नोटीस बजावण्यात आली होती, मात्र, त्यावेळी त्याने पुणे सायबर पोलिसांना काहीही उत्तर दिले नव्हते. मंगळवारी गणेशन हा पोलीस आयुक्त कार्यालयात स्वत: हून हजर झाला. त्यापूर्वी त्याने बंगळुरू कोर्टातून अटकेपासून संरक्षण मिळवले.
टीईटी परीक्षा घोटाळ्यात IAS अधिकाऱ्याचा हात
शिक्षक परीक्षा घोटाळ्यात राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालं होतं. कृषी विभागाचे विद्यमान उपसचिव आणि टीईटी घोटाळा होत असताना शिक्षण विभागाचे उपसचिव असलेले सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली.
टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मधे ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या सांगण्यावरून सुशील खोडवेकरने जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्ट मधून बाहेर काढले आणि या कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
