
वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फुटू शकते, 'स्वराज्य'चा इशारा, पुण्यात सर्किट हाऊसबाहेर मराठा वि. ओबीसी कार्यकर्ते आक्रमक
आमच्या आंदोलनाला नख लावण्याचे काम करू नका. वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते, असा इशारा धनंजय जाधव यांनी या वेळी दिला आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या पुण्यातील शासकीय निवासस्थानी मोठा राडा पाहायला मिळाला . स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीस धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी शासकीय विश्रामगृहात जाऊन छगन भुजबळांना थेट धमकी दिली आहे. आमच्या आंदोलनाला नख लावण्याचे काम करू नका असे धनंजय जाधव म्हणाले. वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते, असा इशारा धनंजय जाधव यांनी या वेळी दिला आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. राज्यात ओबीसी मराठा वाद लागू नये अशी भूमीका छत्रपती संभाजीराजे यांची आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. भुजबळ किंवा तायवाडे चिथावणीखोर वक्तव्ये करतात, मराठा समाजातील नेत्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते. आम्ही फक्त इशारा दिला आहे. आज इशारा दिला आहे कृती करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही. परंतु राज्यात ओबीसी वि. मराठा वाद लागू नये, अशी आमची भूमिका आहे म्हणून आम्ही शांत आहे, असे धनंजय जाधव म्हणाले.
नेमकं झाले काय?
पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना चॅलेंज दिलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली व दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवलं. गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराही दिला. खुले चॅलेंज देऊन भुजबळांना व ओबीसी नेत्यांना धनंजय जाधव यांनी इशारा दिला. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधवला आतमध्ये कसं सोडलं? असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना उपस्थित केला. जाधव यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले.
दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, भुजबळ समर्थक आक्रमक
या घटननेनंतर भुजबळांचे समर्थक देखील आक्रमक झाले. छगन भुजबळाच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली त्यानंर काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भुजबळांची गाडी फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांचा ओबीसी परिषदेच्या वतीने निषेध केला. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका भुजबळ समर्थकांनी घेतली आहे.
छगन भुजबळ सबुरीने घ्या अन्यथा...
छगन भुजबळ यांनी जरा सबुरीने घ्यावं. अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. छगन भुजबळांच्या या भूमिकेला मराठा समाज भुजबळांना कडाडून विरोध करत आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
