एक्स्प्लोर
Advertisement
Misal By Vishnu Manor : ना डीजे, ना रॅली, पुणेकरांकडून महापुरुषांना हटके आदरांजली; महात्मा फुले जयंंतीनिमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केली 10 हजार किलो मिसळ
महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त (Pune Misal Mohotsav) पुण्यामधल्या फुले वाड्यामध्ये (Phule Wada) 10,000 किलो मिसळ तयार करण्यात आली.
पुणे : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त (Pune Misal Mohotsav) पुण्यामधल्या फुले वाड्यामध्ये (Phule Wada) 10,000 किलो मिसळ तयार करण्यात आली. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली आहे. महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना या मिसळच वाटप करण्यात येणार आहे. मंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनीही फुले वाड्यात महात्मा फुलेंना अभिवादन केलं आणि मिसळीची चवही चाखली आहे. अयोध्येत तब्बल 7 हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत ही मिसळ तयार करण्यात आली आहे. साधारण रात्रीपासूनच ही मिसळ तयार करायला सुरुवात करण्यात आली होती.
पुणेकरांचं हटके अभिवादन....
पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या - वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल 10 हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
किती किलो साहित्याचा वापर?
मिसळ तयार करण्याकरिता 15 बाय 15 फूट आकारातील भव्य कढाई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची6.5 फूट असून 2500 किलो वजन आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करुन ही कढई साकारण्यात आली असून झाकणही मोठे आहे. अयोध्येतील विश्वविक्रमानंतर थेट पुण्यातील या उपक्रमाकरिता ही कढई वापरण्यात येणार आहे.
उपक्रमामध्ये मटकी 2000 किलो, कांदा 1600 किलो, आलं 400 किलो, लसूण 400 किलो, तेल 1400 किलो, मिसळ मसाला 280 किलो, लाल मिरची पावडर 80 किलो, हळद पावडर 80 किलो, मीठ 100 किलो, खोबरा कीस 280 किलो, तमाल पत्र 14 किलो, फरसाण 5000 किलो, पाणी 20000लिटर, कोथिंबीर 250 , लिंबू 2000 नग इत्यादी साहित्य वापरण्यात येणार आलं आहे.
मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश 1 लाख, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास 1 लाख यांसह 1000 किलो दही व स्लाईड ब्रेड 3 लाख नग असे साहित्य वापरण्यात आलं आहे. पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे.
इतर महत्वाची बातमी-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement