Sunetra Pawar : कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही; उमेदवारी अर्ज दाखल करताच सुनेत्रा पवारांचा फेसबुक पोस्टमधून रोष कुणावर?
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी 'कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही. एकही शब्द आजपर्यंत वाईट बोलले नाही आणि यापुढेही बोलणार नाही', अशी फेसबुक पोस्ट केली आहे.
![Sunetra Pawar : कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही; उमेदवारी अर्ज दाखल करताच सुनेत्रा पवारांचा फेसबुक पोस्टमधून रोष कुणावर? baramati Loksabha Candidate sunetra Pawar facebook Post Viral After fill candidature Form In pune marathi News Sunetra Pawar : कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही; उमेदवारी अर्ज दाखल करताच सुनेत्रा पवारांचा फेसबुक पोस्टमधून रोष कुणावर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/18/3ed5ebb969227fa104869ca5a78a39c21713440435351442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज पुण्यात मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या वेळी सगळ्यांनी सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचा निर्धार केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी 'कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही. एकही शब्द आजपर्यंत वाईट बोलले नाही आणि यापुढेही बोलणार नाही'. मी विकासाचा कार्यक्रम घेऊनच जनतेसमोर गेले आणि यापुढेही जाईन, अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे आणि त्यांनी सर्वाचे आभार मानले.
ट्विटर पोस्टमध्ये सुनेत्रा पवारांनी नेमकं काय लिहिलंय?
सुनेत्रा पवारांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, 'जनसागराच्या प्रचंड लाटेवर स्वार होऊन पार पडलेली जाहीर सभा अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पार पडलेल्या या महासभेने मला बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या विजयाचा विश्वास अधिकच भक्कम केला, बळकट केला. पुणे येथील जिल्हा परिषदेशेजारी पार पडलेल्या या जाहीर सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, ना. चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, खा. मेधा कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आ. भीमरावअण्णा तापकीर, आ. दत्तामामा भरणे, आ. राहुल कुल, आ. माधुरी मिसाळ, आ. महेश लांडगे, आ. दिलीप मोहिते, आ. अतुल बेनके, आ. सुनील टिंगरे, आ. चेतन तुपे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. अश्विनी जगताप, माजी आमदार रमेशआप्पा थोरात, शरद ढमाले, अशोक टेकावडे, योगेश टिळेकर, माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार महायुतीतील सर्व घटक पक्षांचे राष्ट्रीय, राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी जमलेल्या अफाट जनसागराची आपल्या भाषणात दखल घेत विजयाचा विश्वास होताच तो आता गॅरंटीत परावर्तित झाल्याचे सांगितले. मला विजयी करण्याची विनंती केली. माझ्या भाषणात मी सांगितले, की माझ्या पाठीशी असलेले जनतेचे प्रेम आणि राज्य व केंद्र शासनाच्या भक्कम पाठबळावर बारामती लोकसभा मतदार संघात जनसंपर्क आणि कामाच्या बळावर विकासाच्या प्रक्रियेला गतिमान करेन.
यावेळी झालेला एक शुभशकुन म्हणजे अनेक मान्यवर महायुतीच्या पाठीशी एकवटत असताना उबाठा शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने पुणे जिल्ह्यासह विशेषतः भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार आहे.
या शुभशकुनासोबत जनतेच्या या अफाट प्रतिसादाने पार पडलेल्या या महासभेने एक सिध्द केलं. ते म्हणजे कोणी कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही. एकही शब्द आजपर्यंत वाईट बोलले नाही आणि यापुढेही बोलणार नाही. मी विकासाचा कार्यक्रम घेऊनच जनतेसमोर गेले आणि यापुढेही जाईन. कारण महायुतीपाठी एकवटलेल्या महाशक्तीने आधीचाच विजयाचा विश्वास खात्रीत परावर्तीत केला आहे. ती खात्री देणाऱ्या तमाम नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचे मनापासून आभार'
इतर महत्वाची बातमी-
Sharad Pawar : सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं; शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)