एक्स्प्लोर

Pune Roof Top Hotels : पुण्यातील Roof top हॉटेल्स बनतायत डोक्याला ताप; 9 हॉटेल्सवर धडाधड कारवाई

पुण्यातील विविध भागातील रुफ टॉप हॉटेल्सवर महापालिकेने कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यात आज 9 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यातील आलिशान रुफटॉप हॉटेल्स(Roof top hotel) आता चांगलीच डोकेदुखी बनत चालली आहे. अनेकांनी या हॉटेल्सच्या आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी दिल्या आहे. त्यामुळे आता महापालिकेने या हॉटेल्सवर कारवाई करायला सुरुवात करण्यात आली आहे. मागील चार दिवसांत पुण्यातील 9 रुफ टॉप हॉटेल्सवर महापालिकेने कारवाई केली आहे. 

शहरात वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाईन रोड, भोसरी, आकुर्डी या भागांत मोठ्या संख्येने रुफटॉप हॉटेल आहेत. इमारतीच्या गच्चीवर हे हॉटेल चालविले जातात. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने काही महिन्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात 48 रुफटॉप हॉटेल आढळले होते. अग्निशमन विभागाने या हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर काही हॉटेल बंद करण्यात आली. मात्र, काही हॉटेलमालकांनी नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे महापालिकेने आता प्रत्यक्ष अशा हॉटेलवर कारवाई सुरू केली आहे.

धडाधड कारवाया...

एका वर्षात एकूण 29 रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. शहर पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही पुण्यातील रुफटॉप हॉटेल्सविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत शहरातील अनेक रूफटॉप हॉटेलचे बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. महंमदवाडी, कल्याणीनगर, येरवडा, कोरेगाव पार्क, बाणेर, पाषाण, कोथरूड, खराडी आणि शहरातील इतर भागात असलेल्या प्रसिद्ध रूफटॉप पब आणि बारला यापूर्वी नोटीसा बजावल्या होत्या आणि त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली होती.

तरुणांचा आवाज आणि राडा

पुण्यातील अनेक परिसरात रुफ टॉप हॉटेल्स आणि बार आहेत. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. अनेक तरुण मंडळीचं सध्या आवडीचं ठिकाण म्हणजे अनेक रुफ टॉप हॉटेल्स आणि बार झाले आहेत. तरुणांचा आवाज आणि राडा रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने गाण्याच्या आवाजाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारी दिल्या होत्या. यावेळी पोलिसांवर देखील नागरीक मंचाने आरोप केले होते. 

तरुणांचं आवडतं ठिकाण बनतंय धोक्याचं

सध्या रुफटॉप हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आहे. त्यातील फक्त काहीच हॉटेल्सकडे योग्य ते परवाने असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात शेकडोच्या संख्येने रुफ टॉप हॉटेल्स आहेत. त्यातील काहीच ह़ॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. बाकी हॉटेल्स सर्रास सुरु असल्याचं चित्र आहे. मात्र त्या हॉटेल्सवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधलेल्या लुल्ला नगर परिसरातील हॉटेलला आग लागली होती. त्यावेळी अनेक ग्राहकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता होती. 

इतर महत्वाची बातमी-

Bhide Bridge : डेक्कन बसस्थानक ते भिडे पुलाजवळील रस्ता दोन महिने वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget