(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर हल्लाबोल
शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.
मांजरी - शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य जनतेच्या जनजीवनातील सवाल उपस्थित केला आहे. कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का? , असा हल्लाबोल अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांवर केला आहे.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले की, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं, परवा कोणीतरी म्हणलं की पाहिजे तेवढा निधी देतो, पण कचाकच बटन दाबा. पण ही लोकशाही मूल्यांची अवहेलना होत आहे. हा निधी आपल्याच पैशातून दिला जातो. असं म्हणत अजित पवार यांच्या विधानावर अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र (Amol Kolhe)सोडले आहे.
दरम्यान आढळराव पाटील यांनी देखील आपल्या खेडच्या प्रचार दौऱ्यात उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करत त्यांनी शेवटची निवडणूक म्हणून जाहीर केलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्या आधीच त्यांनी सांगून टाकलं की, त्यांची ही शेवटची निवडणूक. समोर पराभव दिसत असल्याने सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. कोल्हे यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर १५ वर्षाच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर निवडणूकला सामोरे जायला हवं होतं. परंतु तसं काहीच पाहायला मिळत नाही. केवळ वयक्तिक टीका आणि सहानुभूती या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. याशिवाय मतदारसंघात 15 वर्षांत काहीही काम केलं नाही, कोणताही मोठा प्रकल्प आणता आला नाही. त्यामुळे माजी खासदार सपशेल फेल ठरलेले असताना असा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
सर्वसामान्य मतदार सुज्ञ झाला आहे, जर कोणी म्हणलं की ही माझी शेवटीची निवडणूक आहे, याचा अर्थ पुन्हा 2029 ला मत मागायला येणार नसाल तर मतदारांशी बांधीलकी कशी ठेवणार ? असा प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले आढळराव पाटील यांना डॉ. अमोल कोल्हे सवाल केला. ही कोणाची व्यक्तिगत निवडणूक नाही. ही कोणाची पहिली निवडणूक की, कोणाची दुसरी निवडणूक याचा मतदारांना काहीही घेणं देणं नाही. ही देशाची निवडणूक आहे, पुढील पाच वर्षे हा देश कोणाच्या हातात द्यायचा ही त्याची निवडणूक आ