Amit Shah Pune Visit : सहकार क्षेत्रातील पोर्टलचं उद्घाटन करण्यासाठी अमित शहांनी पुणे शहरच का निवडलं? पोर्टलचं उद्दीष्ट काय?
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
Amit Shah Pune Visit : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम पार पडेल. केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या अंतरराजीय डिजिटल पोर्टलचे ते उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' या संकल्पनेतून सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. डिजिटल पोर्टल हा त्याचाच एक भाग आहे.
या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील ही उपस्थित असतील. सोबतच देशातील सहकार क्षेत्राशी निगडित व्यक्ती मोठ्या संख्येनं हजर असतील.
सहकार क्षेत्रासाठी डिजिटल/वेब पोर्टल निर्मित करण्यामागचं उद्धिष्ट
- पूर्णपणे कागदरहित वापर आणि प्रक्रिया असणार आहे.
- सॉफ्टवेअरद्वारे बहुराज्य सहकारी संस्था कायदा (एमएससीएस कायदा) आणि नियमांचे स्वयंचलित पालन करण्यात येणार आहे.
- व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल.
- डिजिटल संवाद सोपा होणार आहे.
- सहकार क्षेत्रातील पारदर्शक प्रक्रिया या वेब पोर्टलच्या माध्यामातून सुरु होणार आहे.
- सुधारित विश्लेषण आणि एमआयएस (व्यवस्थापन माहिती प्रणाली)देखील असणार आहे.
- हा संगणकीकरण प्रकल्प नवीन बहु -राज्य सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
- तसेच त्यांचे कामकाज सुलभ बनवण्यासाठी मदत होणार आहे.
पोर्टलचं उद्घाटन करण्यासाठी पुणे शहरच का निवडलं?
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाया हा सहकार क्षेत्रावर उभा आहे. अमित शहांच्या गुजरातमधील कामाची सुरुवातदेखील सहकार क्षेत्रातून झाली आहे. अहमदाबाद सहकारी बॅंकेचे ते काही वर्ष प्रमुख होते. त्यानंतरही ते सहकार क्षेत्रात ते कार्यरत असायचे. त्यानंतर ज्यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री झाले त्यावेळी त्यांनी सहकार विभागाची निर्मिती केली. या विभागाची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे ठेवली. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलं आहे. त्यामुळे त्यांनी पुण्याची निवड केली असावी.
अमित शहा यांच्याकडून मंत्रिमंडळ मिळणार का?
अमित शहा यांचा हा दौरा शासकीय असला तरी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत बराच काळ असणार आहेत. यादरम्यान त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा होते त्याबद्दल उत्सुकता आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता अधिवेशन संपलं आहे. तेव्हा अमित शहा यांच्याकडून मंत्रिमंडळ मिळतो का? याकडे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :