एक्स्प्लोर

Solapur Cylinder Blast: सोलापूरमधील हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुरड्यांनी जागेवरच जीव सोडला, आई-वडीलही गंभीर जखमी

हॉटेलमध्ये रोजप्रमाणे खाद्यपदार्थ तयार केले जात होते. त्यावेळी गॅसच्या पाईपलाईनमधून गळती होत होती.

Solapur:  घरगुती हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने दोन चिमुकल्या मुलींचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात घडली आहे.  या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रेया दादासाहेब गंगथडे, व स्वरा दादासाहेब गंगथडे ही मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. (Solapur Cylinder Blast)

नेमके घडले काय?

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एका छोट्या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ तयार करत असताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. गॅस पाईप लिकेज असल्याने हा स्फोट झाल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला असून दादासाहेब व मोनाली गंगथडे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये रोजप्रमाणे खाद्यपदार्थ तयार केले जात होते. त्यावेळी गॅसच्या पाईपलाईनमधून गळती होत होती. गळतीची वेळेवर कल्पना न आल्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात श्रेया दादासाहेब गंगथडे आणि स्वरा दादासाहेब गंगथडे या दोन चिमुरड्यांचा जागीच मृत्यू झाला.

आईवडीलही गंभीर जखमी

या हृदयद्रावक घटनेत त्यांचे वडील दादासाहेब गंगथडे आणि आई मोनाली गंगथडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा असल्याने संपूर्ण परिसर हादरला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदतीसाठी पुढे सरसावले. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गॅस पाईपलाईन लिकेजमुळेच स्फोट झाला की अन्य काही कारण होते, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा

जालन्यात भीषण अपघात, बाईकस्वाराला चिरडून कंटेनर थेट घरात शिरला, थरारक व्हिडीओ व्हायरल

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget