Ajit Pawar and Gautam Adani: बारामतीला आलेल्या गौतम अदानींचं अजित पवारांकडून तोंडभरुन कौतुक, म्हणाले....
Ajit Pawar : एकाद्याचं व्हिजन असेल, काम करायची जिद्द असेल तर काय होऊ शकतं, हे अदानी उद्योग समूहाकडे बघून कळतं. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अदानी समूह आणि गौतम अदानींचे कौतुक केलं आहे.

Ajit Pawar and Gautam Adani: गौतम भाई (Gautam Adani) नेहमीच बारामतीत येतात. पवार साहेबांना (Sharad Pawar) दिवाळी शुभेच्छा द्यायला ते येतात. त्यांचे आज पुन्हा बारामतीत आगमन झाले त्यांचे तमाम बारामतीकरांकडून मी मनापासून स्वागत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवात होते. लोकं मोठे झाल्यावर आरोप करतात, टीका-टिप्पणी करतात पण आपण आपलं काम करत राहायचं असतं. माझ्या माहितीप्रमाणे 1990च्या दशकात हि एमआयडीसीची 40 एकर जागा घेतली आणि नक्षत्र उद्यानसह टप्प्याटप्यानं विकासकामे होत गेली. आज मानाचा तुरा त्यात रोवला गेलाय. ते 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या केंद्राचे उद्घाटन होय. ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील तरुण तरुणांसाठी गरज होती. असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय.
बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे (Sharad Pawar Centre of Excellence in Artificial Intelligence) उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून गौतम अदानी हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर शरद पवारांसह अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शिवाय सर्व पवार कुटुंब या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलं आहे. याच कार्यक्रमात अजित पावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी गौतम अदानींचं आणि अदानी समूहाचं तोंडभरुन कौतुक केलंय.
Ajit Pawar on Sharad Pawar : पवार साहेबांचे व्हिजन होत त्याला अनेकांनी साथ दिली
बारामतीच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. बारामतीकरांनी सुरवातीच्या काळात पवार साहेबांना नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यातून त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि विविध क्षेत्रात कार्य केलीत. पवार साहेबांचे व्हिजन होत त्याला अनेकांनी साथ दिली. सुरवातीचा काळ असा होता ज्याला लिहता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला ते येणार नाही तो निरक्षर. नंतर असा काळ आला ज्यामध्ये ज्याला संगणक येईल तो साक्षर समजलं जायचं. मात्र आताचा आणि येणार काळ असा आहे जो एआयचे शिक्षण घेईल तो साक्षर समजला जाईल, अशी शक्यता आहे.
Ajit Pawar on Gautam Adani: अदानी उद्योग समूह 20 देशांत कार्यरत, 3 लाख लोकांना रोजगार
गौतम भाईंनी 1988 साली शून्यातून व्यवसायाला सुरुवात केली. आपली संस्था 1972 सालाची आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत आपण एक रुपया डोनेशन घेतलं नाही. अदानी उद्योग समूह 20 देशांत त्यांचे काम सुरू आहे. 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ते 3 लाख लोकांना अडाणी संस्था रोजगार देत आहेत. पुढच्या पाच वर्षात हा आकडा 5 लाखावर जाईल. त्यामुळे एकाद्याचं व्हिजन असेल, काम करायची जिद्द असेल तर काय होऊ शकतं, हे अदानी उद्योग समूहाकडे बघून कळतं. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अदानी समूह आणि गौतम अदानींचे कौतुक केलं आहे.
Ajit Pawar : अदानी समूहाचा टर्नओव्हर माहिती नाही, पण सीएसआर फंड 1 हजार कोटी
तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र गुजरात मध्ये 2 लाख एकर जमीन जिथं काहीही उगवत नाही अशा जागेवर 30 हजार मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प निर्माण केलं आहे. हे सोप्प काम नाही. वीज निर्मितीमध्ये मोठं काम ते करत आहे. एका हॉस्पिटलची किंमत 5 हजार कोटी आहे, असे दोन हॉस्पिटल अदानी समूहाची आहेत. मी त्यांचा टर्नओव्हर सांगत नाही, तो मला माहित नाही. मात्र त्यांचा सीएसआर फंड 1 हजार कोटी आहे. त्यांवरून तुम्ही त्यांचा टर्नओव्हर बघा किती आहे, आणि दोन वर्षात 3 हजार कोटी सीएसआर होणार आहे असेही अजित पवार म्हणाले.























