एक्स्प्लोर

Pune Rain: रस्त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली, खडकवासला धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस; अजितदादांनी सांगितलं पुण्यातील जलप्रलयाचं कारण

Ajit Pawar On Pune Rain Updates: मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले.

Ajit Pawar On Pune Rain Updates: पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain) अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आज सकाळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत मी सतत हवामान खातं आणि अधिकाऱ्यांसोबत बोलत आहे, अशी माहिती दिली. 

पुण्यात पुढेही पाऊस राहणार आहे. मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले. जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आत्ता जमीन सगळी गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे ओली आहे. पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काॅक्रीट रस्ते आहे. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असं अजित पवारांनी सांगितले. 

...म्हणून इतकी भयानक परिस्थिती झाली- अजित पवार

खडकवासला धरण हे अवघं पावणेतीन टीएमसीचं आहे. परंतु वरच्या भागातच आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे एकदम तीन टीएमसी पाणी धरणात आलं. आम्ही एक कटाक्षाने बघितलं की, रातोरात धरणाचं पाणी सोडायच्या ऐवजी पहाटे धरणाचं पाणी सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला,जेणेकरुन नागरिकांना सोयीचं व्हावं, असं अजित पवार म्हणाले. शाळांना ताबडतोब सुट्टी देण्यात आली. पुण्यात सकल भागात पाणी साचलेलं आहे. सगळीकडेच पाऊस पडल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे. त्यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूने येणारं पाणी आणि ओढा-नाल्यांमधून येणार पाणी, यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. माझ्याकडे साधारण पाच दिवसाचा म्हणजे 24 तारखेचा 25 तारखेचा 26 तारखेचा 27 तारखेचा 28 तारखेचा अशा पद्धतीचा अंदाज आहे. त्याच्यात काही ठिकाणी काल तर रेड अलर्ट होता ऑरेंज अलर्ट होता. पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.  

 सर्वांनी फिल्डवर उतरा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनला सतर्कतेचा आदेश दिले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. 

Ajit Pawar PC VIDEO : अजित पवार यांची पत्रकार परिषद 

संबंधित बातम्या:

Pune Rain: सर्वांनी फिल्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा; एकनाथ शिंदेंचे आदेश

'पुण्यात पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही'; सुप्रिया सुळे संतापल्या, प्रशासनाच्या चुकीवर ठेवलं बोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08:30 PM 16 September 2024 : ABP MajhaSanjay Gaikwad vs Congress : बेताल संजय गायकवाड यांच्यावर काँग्रेसचे नेते तुटून पडले ABP MAJHATOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08 PM 16 September 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 08 PM : 16 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
Embed widget