Nana Kate : अजितदादा पालकमंत्री झाल्यानं पिंपरी पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; अजित पवार गटाच्या नेत्याचा अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये गेली सहा वर्षे ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला आहे.
पुणे : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये गेली (Pune News) सहा वर्षे ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. असं म्हणत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. दादा पालकमंत्री झाल्यानं जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल तर चुकीचं काम करणाऱ्यांचा मात्र तोटा होईल, असा अजितदादा गटाला विश्वास आहे. तर भाजप अजितदादांना पालकमंत्री पदाचे अधिकार देणार नाहीत, तसेच अजितदादा भाजपचा पालिकेतील भ्रष्टाचार ही बाहेर काढणार नाहीत, अशी शंका उपस्थित करणाऱ्या शरद पवार गटाचा हा केवळ राजकीय आरोप आहे, असा पलटवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे (nana kate) यांनी केला आहे.
नाना काटे म्हणाले की, अजित पवारांच्या कामाची पद्धत सगळ्या राज्याला महिती आहे. तिच पद्धत दादा येत्या काळात वापरणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे पालकमंत्री झाल्यापासून अनेकांचे धाबे दणाणले आहेत आणि चैतन्याचं वातावरण शहरामध्ये दिसत आहे. याचा आनंद संपूर्ण शहरात कालच दिसून आला. संपूर्ण अजित पवारांच्या समर्थकांनी पेठे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. मागील पाच वर्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजप नेत्यांवर नाना काटे यांनी निशाणा साधला आहे. 'आतापर्यंत पालिकेत ज्यांनी चुकीचं काम केलं आहे. त्यांचे चांगलेच धाब दणाणले आहे',असं म्हणत त्यांनी अप्रक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.
पालकमंत्रीपदामुळे कोणाचा फायदा, कोणाचा तोटा?
अजित पवार हे महायुतीत असले तरीही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यांच्या कामाची पद्धत माहित आहे. ते कोणतंही काम तात्कळत ठेवत नाही, हे जिल्ह्यातील अनेकांना माहिती आहे. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीलाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अजित पवार पालकमंत्री झाल्याचा फायदा होणार असल्य़ाचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि चुकीची कामं करणाऱ्यांचा तोटा होईल, असंही त्यांनी खडसावून सांगितलं आहे.
नाना काटे यांचा युटर्न?
2017 ते 2022 या काळात राष्ट्रवादीने भाजविरोधात आवाज उठवला होता आणि अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र आता नाना काटे यांनी यावर युटर्न घेतला आहे. तेव्हा केलेले आरोप हे सिद्ध झाले नाहीत. ते आरोप सिद्ध झाले, तर आम्हाला त्याचा फायदा होईल, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-