Air Pollution : मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब! पुणे शहरात हवेची गुणवत्ता पुन्हा खालवली
Pune Air Quality Index : धुळीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याची माहिती देण्यासाठी पुणे महापालिकेकडून व्यवसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटीस देण्यात आली आहे.
Air Quality in Pune : पुणे (Pune) शहरात हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Index) पुन्हा खालवली आहे. पुणे शहरात हवा प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील एअर क्वालिटी इंडेक्स 150 वरून थेट 263 वर पोहोचला आहे. पुणे महानगरपालिकेकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई पाठोपाठ राज्याचं सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याच्याही (Pune News) हवा बिघडली आहे. पुणे शहर आता हवेच्या गुणवत्तेबाबत मुंबईच्या मागे पोहोचलं आहे. पुण्यानं मुंबईलाही हवेच्या गुणवत्ता बाबत मागे टाकलं आहे. मुंबईपेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब
प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून बांधकाम व्यवसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. राज्य प्रदूषण नियामक महामंडळाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने नोटीस पाठवल्या आहेत. कामाच्या ठिकाणी धुळीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याची माहिती देण्यासाठी महापालिकेकडून नोटीसद्वारे देण्यात आली आहे.
पुणे शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली
प्रदूषण रोखण्यासाठी शहरात गर्दीच्या चौकांमध्ये लवकरच मिस्ट बेसड् फाउंटन उभारण्यात येणार आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिका अनेक उपाययोजना राबवणार आहे.
गेले काही दिवस मुंबईसह पुण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा झाली होती. पण, आता दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा प्रदूषणात वाढ झाली आहे.
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा प्रदूषणात वाढ
मागील अनेक दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी माॅडरेट श्रेणीत दिसत होती, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसलं. पुन्हा एकदा प्रदूषणात भर पडताना दिसत आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासंदर्भात महापालिका प्रशासना विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
प्रदूषक आणि धुलिकणांच्या मात्रेत वाढ
मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमधील हवा गुणवत्ता खालवल्याचं चित्र दिसत आहे. मागील 24 तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट श्रेणीत घसरला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झालं आहे. राज्यातील अनेक शहरात प्रदूषक पीएम 2.5, पीएम 10 च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात NO2 तर जालन्यात O3 प्रदूषकाची मात्रा वाढली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra Weather : पुढील 4 दिवस पाऊस! राज्यात 'या' भागात पावसाचा अंदाज; हवामान खात्याने वर्तवला अंदाज