एक्स्प्लोर

एबीपीच्या बातमीची दखल; पिंपरी चिंचवडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफीचे गुन्हे दाखल

पुणे शहरातून शंभर ते दीडशे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आल्याची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही या संदर्भात चार गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे : भारतात कायद्याने चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी आहे. असे असतानाही पुणे शहरातून शंभर ते दीडशे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आल्याची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली होती. याप्रकरणी राज्य सायबर सेल विभाग खडबडून जागा झालाय. राज्य सायबर सेलने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असे चार गुन्हे घडल्याची माहिती दिलीये. त्यानुसार काल गुरुवारी एकाच दिवशी बाल लैंगिक अत्याचाराचे चार गुन्हे दाखल झालेत. पुणे शहरातून शंभर ते दीडशे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली असून दोघा सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. राजकरण पुट्टीलाल (24) आणि मनोजकुमार सरोज (19) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याची बातमी गुरुवारी एबीपी माझाने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर पिंपरी चिंचवड शहरातही बाल लैंगिक अत्याचाराचे चार गुन्हे दाखल झालेत. यातील दोन गुन्ह्यांमधील आरोपींचा चाकण, तर चिखली आणि वाकड पोलीस प्रत्येकी एका गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. या चौघांनी फेसबुकवरुन अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ प्रसारित केलेत. चारही आरोपींची नावं निष्पन्न झाली असून राज्य सायबर सेलने तातडीने कारवाईचे आदेश दिलेत. पुण्यात चाईल्ड पोर्नोग्राफी करत व्हिडीओ व्हायरल, दोघा सख्ख्या भावांना अटक गुगलकडून केंद्र सरकारला माहिती - गुगलने काही दिवसांपूर्वी 35 हजार चाईल्ड पोर्नोग्राफ व्हिडीओची माहिती केंद्र सरकारला कळविली होती. त्यानुसार केंद्र सरकारने संबंधित राज्यातील महासंचालकांना ही माहिती पाठवली होती. त्यानंतर महासंचालकांनी राज्यातील पोलीस आयुक्तांकडे ही माहिती पाठवली होती. पुण्यातून 100 ते 150 व्हिडीओ अपलोड झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सुरुवातीला पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे व्हिडीओ ज्या मोबाईल अथवा लॅपटॉपवरून अपलोड झाले आहेत. यूएलआरवरून संबंधितांचा शोध सुरू आहे. भारत सर्वाधिक पॉर्न पाहणारा जगातला तिसरा मोठा देश - पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना या इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट्समुळे होत असून पॉर्न साईट्सवर बंदीची मागणी झाली. मोदी सरकारने अनेक पॉर्न साईट्सवर बंदी देखील घातली होती. मात्र, आता पुन्हा अनेक पॉर्न साईट सुरू आहेत. या साईट्सवर चाईल्ड पोर्नोग्राफी देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचा रिसर्च आहे. Sexual Assault | माटुंगा रेल्वे पुलावर भरदिवसा महिला,तरुणींचा विनयभंग, सीसीटीव्ही पुरावे असतानाही गुन्हे दाखल नाही

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget