एक्स्प्लोर

Amol Kolhe : बैलगाडा शौकिनांसाठी अमोल कोल्हेंकडून खास गिफ्ट; केली 'ही' मोठी घोषणा

बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच शौकिनांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बैलगाडा थरार, मेहनत आणि त्यासाठी  संपूर्ण लागणारी तयारी महाराष्ट्रातील घराघरात पोहचणार आहे.

Amol Kolhe :   राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे शौकिनांनी आनंद व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार आमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच शौकिनांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बैलगाडा थरार, मेहनत आणि त्यासाठी संपूर्ण लागणारी तयारी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणार आहे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरु झाली आहे. लवकरच हा दिमाखदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बैलगाडा मालकाचे कष्ट, त्यांचं बैलांसोबत असलेलं नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे." यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दबावतंत्र वापरलं जातं आहे. हे अनेक वर्ष संसदेत हा विषय मांडताना मी अनुभवत आहे. या आंतरराष्ट्रीय दबावतंत्राचा देखील बुरखा पाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

बैलगाडा शर्यत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे

ते पुढे म्हणाले की, "काही गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका 157 देशांमध्ये पोहोचली. त्यावेळी संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरातील मुलांपर्यंत पोहोचला. त्यानंतर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने प्रत्येक शहरात मोठ्या संख्येने प्रेक्षक इतिहास अनुभवत आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे. ती याच पद्धतीने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विदेशी लोक येतील आणि या शर्यतीचा एक मोठा सोहळा होईल, अशा पद्धतीने हा चित्रपट तयार केला जाणार आहे." 

'याचसाठी केला होता अट्टाहास'

"राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. सगळ्या बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी हा दिवाळी, दसऱ्यासारखा दिवस आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी देताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घालून दिल्या आहेत. आनंदाची बाब असली तरीदेखील ही मोठी जाबाबदारीही आहे. सुप्रीम कोर्टाच्या सर्व नियमांचं पालन करुन यापुढील बैलगाडा शर्यती दिमाखदार पद्धतीने पार पडतील," असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. याचसाठी केला होता अट्टाहास, ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक बैलगाडा मालकाचं, शौकिनांचं आणि प्रेमींचं हे मोठं यश आहे. यातून परंपरेचं जतन होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget