Rohit Pawar : राज्यपालांवर कारवाई झालीच पाहिजे, आजीबाईंचा दोन तास उन्हात ठिय्या
राज्यपालांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांच्या आत्मक्लेश आंदोलनात 73 वर्षीय आजीने केली आहे. कौशल्य यशवंत असं या आजीचं नाव आहे.
Rohit Pawar News : राज्यपालांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत रोहित पवार यांच्या आत्मक्लेश आंदोलनात 73 वर्षीय आजीने केली आहे. कौशल्य यशवंत असं या आजीचं नाव आहे. महापुरुषांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांंच्या समाधी स्थळी वढु बुद्रुक या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. यावेळी या आजीने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
दोन तास आजींचा उन्हात ठिय्या
शिवाजी महारांजाबाबत चुकीचं बोलतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसाठी आजी उन्हात बसल्या होत्या. आता कारवाई झाली तर अजून अशी वक्तव्य वारंवार करतील. त्यात पुढच्या पीढीला असा वाईट संदेश जात आहे. कारवाई झाल्यास पुढची पीढीतरी अशी वक्यव्य करणार नाहीत. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी किती कष्ट घेतले. त्यांच्या अंगावर मीठ-मिरची टाकली तरीदेखील ते तटस्थ होते. आपल्यासाठी त्यांनी एवढं केलं त्यांच्यासाठी पाच मिनिटं उन्हात बसणं आपल्याला शक्य होत नसेल तर आपण माणसं म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाहीत, असं म्हणत आजी भावूक झाल्या होत्या.
राष्ट्रवादीचे नेते उपस्थित
या आत्मक्लेश आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, सुनील टिंगरे, अशोक पवार, संदीप क्षीरसागर, यशवंत माने हे नेते उपस्थितीत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सतत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी मौन धरून आत्मक्लेश करण्यात आला. यावेळी विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आत्मक्लेशानंतर सगळ्यांनी घोषणाबाजी केली.
सर्वसामान्य शिवभक्त आक्रमक
राज्यपालांनी शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अनेक पक्ष आणि संस्थानी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात स्वराज्य संस्था आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यपाल पुणे दौऱ्यावर असताना स्वराज्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. त्यांच्यासोबतच सर्वसामान्य शिवभक्तदेखील आक्रमक झाले आहे. आज देखील शिवभक्तांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
रोहित पवारांकडून उदयराजेंच्या भूमिकेचं समर्थंन
आम्ही कोणतंही राजकारण करत नाही. आज आम्ही केलेलं आत्मक्लेश राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून मुळीच केलेलं नाही. तर महाराजांचे मावळे म्हणून केलेलं आहे. हे मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. आमच्या मागे जो बॅनर लागला होता, त्यावर एकाही नेत्याचा आणि पक्षाचा फोटो नाही आहे. आम्ही केवळ थोरपुरुषांचे फोटो लावलेले आहेत. याच थोरांचा वारसा आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणूनच आज आम्ही छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.