एक्स्प्लोर

Pune Crime: बाप की सैतान! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार अन्..., असे झाले काळे कारनामे उघड

Pune Crime: पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

पुणे: सांस्कृतीक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून गुन्हेगारीच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. असं असतानाच बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा उलगडा शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आला आला आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नराधम बापाला पुणे पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

पंकज देवेंद्र ठाकूर वय ३५ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मुळचा बिहारचा राहणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षापासुन तो मुलीला चक्क अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये असे अश्लील व्हिडिओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलीसांकडून देण्यात आली आहे.

घटना कशी आली उघडकीस?

ही धक्कादायक घटना शाळेतील गुड टच बॅड टच उपक्रमातून उघडकीस आली. शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

अश्लिल व्हिडीओ दाखवत पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार 

पिडित मुलगी वारजे माळवाडी परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहते. ही मुलगी सहावीमध्ये शिकत असून ती 11 वर्षांची आहे. शाळेत गुड टच बॅड टच उपक्रम सुरू असताना मुलीने याबाबतची माहिती दिली. मुलीवर तिच्याच वडिलांनी घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवत बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. 

उपक्रमादरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार शिक्षिकेला सांगितला. शिक्षिकेला देखील मोठा धक्का बसला. यानंतर शिक्षकांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी बापाविरोधात गुन्हा दाखल करत केला, काही तासांत नराधम बापाला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने आरोपी बापाला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुण्यात आठ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी  सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं
रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं
भाजपला दे धक्का... हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं स्टेटस ठेवलं; चंद्रकांत पाटलांनीही स्पष्टच सांगितलं
भाजपला दे धक्का... हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं स्टेटस ठेवलं; चंद्रकांत पाटलांनीही स्पष्टच सांगितलं
Israel–Hezbollah conflict : अरब देशांचे 'स्वित्झर्लंड' होरपळतंय; पॅलेस्टीनशी मैत्री अन् इस्रायलशी वैर करण्यात लेबनॉन उद्ध्वस्त कसा झाला?
अरब देशांचे 'स्वित्झर्लंड' होरपळतंय; पॅलेस्टीनशी मैत्री अन् इस्रायलशी वैर करण्यात लेबनॉन उद्ध्वस्त कसा झाला?
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, उद्धव ठाकरेंकडून ‘गोंधळ गीत’ लाँच, एकनाथांच्या नावे तोतयागिरी सुरू, ठाकरेंचा हल्ला
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, उद्धव ठाकरेंकडून ‘गोंधळ गीत’ लाँच, एकनाथांच्या नावे तोतयागिरी सुरू, ठाकरेंचा हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 OCT 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 3 PM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :  3 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaUddhav Thackerayन्याय व्यवस्थेवर विश्वास मात्र न्याय मिळत नाही म्हणून जगदंबेला साकडं : उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं
रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं
भाजपला दे धक्का... हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं स्टेटस ठेवलं; चंद्रकांत पाटलांनीही स्पष्टच सांगितलं
भाजपला दे धक्का... हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं स्टेटस ठेवलं; चंद्रकांत पाटलांनीही स्पष्टच सांगितलं
Israel–Hezbollah conflict : अरब देशांचे 'स्वित्झर्लंड' होरपळतंय; पॅलेस्टीनशी मैत्री अन् इस्रायलशी वैर करण्यात लेबनॉन उद्ध्वस्त कसा झाला?
अरब देशांचे 'स्वित्झर्लंड' होरपळतंय; पॅलेस्टीनशी मैत्री अन् इस्रायलशी वैर करण्यात लेबनॉन उद्ध्वस्त कसा झाला?
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, उद्धव ठाकरेंकडून ‘गोंधळ गीत’ लाँच, एकनाथांच्या नावे तोतयागिरी सुरू, ठाकरेंचा हल्ला
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, उद्धव ठाकरेंकडून ‘गोंधळ गीत’ लाँच, एकनाथांच्या नावे तोतयागिरी सुरू, ठाकरेंचा हल्ला
Chaitanya Maharaj Arrested: ...तेव्हा पोलिसांची सहनशीलता संपली, चैतन्य महाराजांना दाखवला इंगा; अटकेचं नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर
...तेव्हा पोलिसांची सहनशीलता संपली, चैतन्य महाराजांना दाखवला इंगा; अटकेचं नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर
पोलिसांकडून बेड्या, किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण?, रिलस्टार, युट्युबवर फेमस
पोलिसांकडून बेड्या, किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण?, रिलस्टार, युट्युबवर फेमस
Sadguru Feet Pic Controvercy:सदगुरु जग्गी वासुदेव त्यांच्या पायांचा फोटो किती रुपयाला विकतात माहितीये? सोशल मीडियावर गदारोळ
सदगुरु जग्गी वासुदेव त्यांच्या पायांचा फोटो किती रुपयाला विकतात माहितीये? सोशल मीडियावर गदारोळ
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारचा निर्णय, आता कमीत कमी पाचशे
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारचा निर्णय, आता कमीत कमी पाचशे
Embed widget