Pune Swargate ST Bus Depo : मोठी बातमी! स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती
Pune Swargate : स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये (Pune Swargate ST Bus Depo) झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये (Pune Swargate ST Bus Depo) झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात 923 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अत्याचार प्रकरणात 923 पानांचे आरोपपत्र दाखल
स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याची 2 दिवसांची पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवले आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गाडेची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये 82 साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. या प्रकरणी एकूण बारा पंचनामे करण्यात आले असून, पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.(Pune Swargate ST Bus Depo)
बलात्कार प्रकरणी चुकीच्या दिशेने तपास सुरू, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष- वैभव नाईक
स्वारगेट बलात्कार झाल्यानंतर सर्व एसटी बस स्टँड येथील जुन्या भंगारात पडलेल्या बसेस आणि गाड्या हटवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यासाठी 15 एप्रिल ही डेडलाइन दिली होती. मात्र परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांनी अजूनही याबाबत योग्य ती कारवाई सुरू केलेली नाही, यावर बोलताना वैभव नाईक यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणी चुकीच्या दिशेने तपास सुरू आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणी बससील करण्यात आलेली नाही. अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आली. नुसत्या बसेस नाही, तर हायवेवर अनेक गाड्या उभ्या असतात त्यातही असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे अशा सर्वच गाड्यांवर परिवहन विभागाने कारवाई केली पाहिजे. कारवाई केली तरच असे प्रकार थांबतील. असेही माजी आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या

























