Propose Day 2023 Astrology: प्रपोज डे ला प्रेम व्यक्त करायचंय? तर आधी जाणून घ्या पंचांगानुसार शुभ-अशुभ मुहूर्त
Propose Day 2023 Astrology: प्रपोज डे ला तुमच्या पार्टनरला तुमचे प्रेम कधी व्यक्त करायचे आणि कधी नाही? हे जाणून घ्या
Propose Day 2023 Astrology : सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine Day 2023) म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाला प्रपोज डे (Propose Day 2023) म्हणतात. 7 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सुरू होतो. आणि आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रपोज डे 8 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपले प्रेम व्यक्त करून हा दिवस साजरा करतात. लाइफ पार्टनर किंवा त्यांच्या आवडीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करण्याची इच्छाही ते व्यक्त करतात. प्रपोज डे हा फक्त आपल्या मनातील प्रेमभावना सांगण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
प्रपोज डेच्या शुभ मुहूर्तावर तुमचे प्रेम व्यक्त करा
8 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच आज प्रपोज डे साजरा करण्यात येतोय. प्रपोज डेच्या शुभ मुहूर्तावर तुमचे प्रेम व्यक्त करणे तुमच्यासाठी शुभ असू शकते. जरी तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणताही वेळ किंवा एक दिवस नसतो, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार पाहिलं तर, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज करणार असाल किंवा काही खास करणार असाल तर वेळेची काळजी घ्या. एखाद्या शुभ कार्याची सुरुवात अशुभ काळात करू नये, त्यामुळे अडथळे निर्माण होतात. प्रपोज डे वर तुमच्या पार्टनरला तुमचे प्रेम कधी व्यक्त करायचे आणि कधी नाही? ज्योतिषशास्त्रानुसार हे जाणून घेऊया
प्रपोज डे 2023 शुभ मुहूर्त
शुभ मुहूर्तावर काम सुरू केल्याने त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. अशात, प्रपोज करण्यासाठी शुभ वेळ निवडणे तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी असेल.
अमृत काळ - 01:13 PM - 02:47 PM
अमृत - सर्वोत्तम - सकाळी 08 वाजून 32 - सकाळी 09 वाजून 55 मि.
रात्री 09 वाजून 27 मिनिटे - रात्री 11 वाजून 04 मिनिटे
राहुकाळात प्रपोज करू नका, आजचे अशुभ मुहूर्त जाणून घ्या
हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पंचांग पाहण्याची परंपरा आहे, व्हॅलेंटाईन सप्ताह सुरू झाला आहे. या आठवड्यानुसार आज प्रपोज डे आहे. तुम्हीही एखाद्याला प्रपोज करणार असाल तर आज पंचांगानुसार कोणता अशुभ मुहूर्त साधावा हे जाणून घ्या. मान्यतेनुसार राहुकालमध्ये शुभ कार्य होत नाहीत. असे मानले जाते की राहुकालमध्ये केलेले कार्य चांगले फळ देत नाही.
आजच्या पंचांगानुसार जाणून घ्या - 8 फेब्रुवारीचे अशुभ मुहूर्त
कालवेळा - सकाळी 07:49 - सकाळी 08:33
राहू काळ - 12:35 PM - 01:58 PM
यमगंड - 08:27 am - 09:50 am
यमघंट - 09:17 am - 10:01 am
गुलिक काळ - 11:12 am - 12:35 pm
दुष्ट मुहूर्त - 12:13 PM - 12:57 PM
कुलिक - 12:13 pm - 12:57 pm
कंटक - 04:37 pm - 05:21 pm
प्रपोज डेची सुरुवात कशी झाली?
प्रपोज डे सुरू करण्यामागे अनेक मते आहेत. ऑस्ट्रियन आर्कड्यूक मॅक्सिमिलियनने 1477 मध्ये मेरी ऑफ बरगंडीला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. 1816 मध्ये, राजकुमारी शार्लोटने तिच्या भावी पतीला प्रपोज केले, तेव्हापासून व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Valentine Day 2023 Astrology : व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी शुक्राचे राशीपरिवर्तन, कोणत्या राशीवर काय परिणाम होणार?